Weather Alert : महाराष्ट्राला आता बसणार बर्फासारखा लाटेचा तडाखा, या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात थंडीचा कडाका काहीसा अधिक आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यातील सर्वच भागांत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील सर्वच भागांत अजूनही थंडीचा कडाका कायम आहे. थंडीची लाट नसली तरीही नागरिकांना बोचरी थंडी सहन करावी लागत आहे. 18 डिसेंबर रोजी राज्यातील विविध भागांत मुख्यतः निरभ्र आकाश तसेच धुकं पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर किमान तापमानात देखील घट कायम असणार आहे. 17 डिसेंबर रोजी जेऊर येथे राज्यातील नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पाहुयात, 18 डिसेंबर रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढीवर आहे. नाशिकमधील पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरण्याची शक्यता आहे. 18 डिसेंबर रोजी तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातही पारा घसरण्याची शक्यता आहे.
advertisement
विदर्भातही थंडीचा कडाका कायम आहे. विशेषतः पूर्व विदर्भात पारा चांगलाच घसरला आहे. विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तसेच गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
advertisement
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात थंडीचा कडाका काहीसा अधिक आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यातील सर्वच भागांत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी पिकांना योग्य संरक्षण द्यावं. त्याचबरोबर लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्तींनी थंडीपासून बचाव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











