Tanya Mittal: तान्या मित्तलच्या Ex बॉयफ्रेंडचा सोशल मीडियावर धुरळा, तुरुंगातून बाहेर येताच शेअर केला 'तो' VIDEO

Last Updated:

Tanya Mittal Ex-Boyfriend: तान्याचा एक्स प्रियकर बलराज सिंग याने जेलमधून सुटताच दिलेल्या एका प्रतिक्रियेने सोशल मीडियावर खळबळ माजवून दिली आहे.

News18
News18
मुंबई: 'बिग बॉस'च्या घरात दरवर्षी अजब-गजब स्पर्धक येतात, पण यंदा सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या यूट्यूबर आणि आध्यात्मिक इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल हिच्यावर. तान्या सध्या तिच्या लॅविश लाईफस्टाईलमुळे आणि घरात होणाऱ्या हाय-व्होल्टेज राड्यांमुळे स्पॉटलाईटमध्ये राहिली. मात्र, आता तान्याचा एक्स प्रियकर बलराज सिंग याने जेलमधून सुटताच दिलेल्या एका प्रतिक्रियेने सोशल मीडियावर खळबळ माजवून दिली आहे.
तान्या मित्तल हिने बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवल्यापासून जे दावे केले आहेत, ते ऐकून प्रेक्षकांचे डोळे विस्फारले आहेत. तिने एकदा शोमध्ये म्हटले होते की, तिच्या संरक्षणासाठी तब्बल १५० बॉडीगार्ड्स तैनात असतात. इतकेच नाही, तर तिच्या घरी फक्त कपडे आणि फॅशनच्या वस्तूंसाठी एक संपूर्ण स्वतंत्र मजला राखीव आहे.

तान्या मित्तलच्या एक्स बॉयफ्रेंडला झाली होती अटक

advertisement
तान्या मित्तल आणि बलराज सिंग यांच्यातील वाद मागील काही काळापासून कोर्ट-कचेऱ्यांपर्यंत पोहोचला होता. याच वादामुळे बलराजला काही दिवस जेलची हवा खावी लागली होती. मात्र, आता जामीन मिळवून बाहेर आल्यानंतर बलराजने शांत बसण्याऐवजी आपली बाजू खंबीरपणे मांडली आहे.
त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. बलराज म्हणतो, "मी इथे प्रामाणिकपणा, ताकद आणि जिद्दीने पुढे जाण्यासाठी सज्ज आहे. या इंडस्ट्रीत मला कोणाच्या नावावर नाही, तर स्वतःच्या कष्टावर ओळख निर्माण करायची आहे. देवाने मला दुसरी संधी दिली आहे, ज्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे."
advertisement












View this post on Instagram























A post shared by TCX.official (@tellychakkar)



advertisement

देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास 

बलराजने पुढे नमूद केले की, त्याच्या आयुष्यात जे काही घडले, त्याने त्याला अधिक मजबूत केले आहे. "मला सत्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. मला फक्त तुमच्या प्रेमाची आणि समर्थनाची गरज आहे," असे म्हणत त्याने नव्या सुरुवातीचे संकेत दिले आहेत.
advertisement
एकूणच, तान्या मित्तल स्वतःची 'धुरंधर' इमेज टिकवण्याचा प्रयत्न करत असताना, तिचा 'एक्स' प्रियकर आपल्या प्रतिमेची पुनर्बांधणी करण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोघांमधील हा वाद आता कोणते नवीन वळण घेणार? बलराजच्या या खुलाशानंतर तान्याची काय प्रतिक्रिया असेल? हे पाहणे खरोखर रंजक ठरेल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Tanya Mittal: तान्या मित्तलच्या Ex बॉयफ्रेंडचा सोशल मीडियावर धुरळा, तुरुंगातून बाहेर येताच शेअर केला 'तो' VIDEO
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement