बंदी असूनही पाकिस्तानात गाजतोय 'धुरंधर', आता पाकचा बॉलिवूडवर पलटवार! 26 जानेवारीला रिलीज होणार फिल्म

Last Updated:
Pakistan Making Movie on Layari: 'धुरंधर'ने मलीन केलेली प्रतिमा सुधारण्यासाठी आता पाकिस्तान सरकारने कंबर कसली आहे. बॉलिवूडच्या या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी सिंध सरकारने चक्क स्वतःचा नवा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.
1/9
Dhurandhar pakistan
मुंबई: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटाने सध्या सीमेच्या दोन्ही बाजूला मोठी खळबळ माजवून दिली आहे. भारतात हा चित्रपट गल्ला जमवण्यात व्यस्त असताना, पाकिस्तानात मात्र या चित्रपटाने राजकीय युद्ध सुरू केलंय.
advertisement
2/9
Dhurandhar pakistan
चित्रपटात दाखवलेला पाकिस्तानचा चेहरा पाहून तिथल्या सरकारची झोप उडाली आहे. आश्चर्य म्हणजे, पाकिस्तानात अधिकृतपणे या चित्रपटावर बंदी असतानाही, तिथली जनता चोरून-लपून का होईना पण 'धुरंधर'चा थरार अनुभवत आहे.
advertisement
3/9
Dhurandhar pakistan
पाकिस्तानात थिएटर्समध्ये बंदी असली तरी इंटरनेटच्या जगात ही फिल्म थांबवणं अशक्य झालंय. श्रीलंकेपासून मलेशियापर्यंतच्या सर्व्हर्सचा वापर करून 'धुरंधर'चे पायरेटेड लिंक्स पाकिस्तानात वाऱ्यासारखे पसरत आहेत.
advertisement
4/9
Dhurandhar pakistan
काही डार्क वेब एक्सपर्ट्स तर चक्क चिनी होस्टिंग वेबसाईटचा आधार घेऊन ही फिल्म पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाच्या छोट्या छोट्या क्लिप्स शेअर करून भारताच्या या नॅरेटिव्हची तिथे खिल्ली उडवली जातेय, पण तरीही ही फिल्म पाहण्याचा मोह कोणालाच आवरत नाहीये.
advertisement
5/9
Dhurandhar pakistan
चित्रपटात रणवीर सिंगने 'हमजा' नावाच्या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे, जो कराचीच्या 'लियारी' भागात घुसून तिथलं दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करतो. लियारीला ज्या प्रकारे वॉर झोन म्हणून दाखवलंय, त्यावर पाकिस्तानचे नेते संतापले आहेत.
advertisement
6/9
Dhurandhar pakistan
इतकंच नाही, तर चित्रपटात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) झेंडे आणि दिवंगत बेनझीर भुट्टो यांची छायाचित्रे वापरल्याने मोठा कायदेशीर पेच निर्माण झालाय. कराचीच्या कोर्टात या चित्रपटाच्या टीमविरोधात एफआयआर करण्याची मागणीही झाली आहे.
advertisement
7/9
Dhurandhar pakistan
'धुरंधर'ने मलीन केलेली प्रतिमा सुधारण्यासाठी आता पाकिस्तान सरकारने कंबर कसली आहे. बॉलिवूडच्या या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी सिंध सरकारने चक्क स्वतःचा नवा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. 'मेरा लियारी' असं या चित्रपटाचं नाव असून, तो जानेवारी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
advertisement
8/9
Dhurandhar pakistan
या चित्रपटातून लियारीची गुन्हेगारी पार्श्वभूमी न दाखवता, तिथली फुटबॉल संस्कृती, दिग्गज बॉक्सर आणि तिथलं शांततामय जीवन दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. अबु अलीहा यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा म्हणजे बॉलिवूडच्या 'धुरंधर'ला दिलेला थेट फिल्मी रिप्लाय मानला जात आहे.
advertisement
9/9
एकीकडे पाकिस्तान सरकार इमेज वाचवण्यासाठी नवीन सिनेमा बनवत आहे, तर दुसरीकडे तिथली तरुण पिढी टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर 'धुरंधर'च्या गाण्यांवर आणि सीन्सवर रील्स बनवत आहे.
एकीकडे पाकिस्तान सरकार इमेज वाचवण्यासाठी नवीन सिनेमा बनवत आहे, तर दुसरीकडे तिथली तरुण पिढी टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर 'धुरंधर'च्या गाण्यांवर आणि सीन्सवर रील्स बनवत आहे.
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement