VIDEO : चलो बुलावा आया है...लिओनेल मेस्सी देवीच्या भक्तीत तल्लीन झाला, 'जय माता दी'चे दिले नारे

Last Updated:

मेस्सी यावेळी गणपत्ती बाप्पांचे मस्तक टेकवून दर्शन घेतले.त्यानंतर आरतीचे ताट हातात घेऊन देवी मातेची पुजा केली.या दरम्यान मेस्सीने जय मातादीचे नारे देखील दिले होते. हे दृष्य पाहून अनेकांना आनंद झाला आहे.

Lionel Messi Vantara Visit Anant Ambani Video
Lionel Messi Vantara Visit Anant Ambani Video
Lionel Messi Vantara Visit Anant Ambani Video : दिग्गज फुटबॉलपट्टू लिओनेसल मेस्सी याचा भारतीय दौरा संपुष्ठात आला आहे आणि तो आपल्या मायदेशी परतला आहे. दरम्यान दोन दिवस अनेक शहरांना आणि सेलिब्रिटींना भेटी दिल्यानंतर बुधवारी मेस्सी अनंत अंबानी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या वनतारा भेट दिली.त्यावेळी अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर मेस्सीने सनातन धर्म व हिंदू चालरितींनुसार महाआरती आणि हिंदू देवीदेवतांची पूजा आणि शिवाभिषेक केला आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
वनताराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लिओनेस मेस्सीच वनतारामध्ये कसं स्वागत करण्यात आलं होतं. हे दाखवण्यात आले होते.यासोबत मेस्सी यावेळी गणपत्ती बाप्पांचे मस्तक टेकवून दर्शन घेतले.त्यानंतर आरतीचे ताट हातात घेऊन देवी मातेची पुजा केली.या दरम्यान मेस्सीने जय मातादीचे नारे देखील दिले होते. हे दृष्य पाहून अनेकांना आनंद झाला आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Vantara (@vantara)



advertisement
दरम्यान मेस्सीच्या वनतारा भेटीबाबात वनताराकडून माहिती देण्यात आली. वनताराने सांगितले की, जागतिक फुटबॉलचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीने वनताराला विशेष भेट दिली. सनातन धर्मानुसार देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन भेटीची सुरुवात करण्याची परंपरा आहे. मेस्सीच्या भेटीतून हीच सांस्कृतिक भावना दिसून आली, कारण त्याने पारंपरिक हिंदू विधींमध्ये सहभाग घेतला, वन्यजीवांचा आश्रय पाहिला आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांशी संवाद साधला.
advertisement
या भेटीदरम्यानच्या त्याच्या कृतींमधून तो ज्या नम्रतेसाठी आणि मानवतावादी मूल्यांसाठी ओळखला जातो, तीच मूल्ये दिसून आली. तसेच, वन्यजीव संवर्धनाप्रती असलेल्या सामायिक वचनबद्धतेतून अनंत अंबानी यांच्यासोबतचे त्याचे उबदार नाते आणि मैत्री अधोरेखित झाली.
पुढे वनताराने म्हटले आहे की, मेस्सी, त्याचा इंटर मियामी संघातील सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल यांच्यासोबत यांचे भव्य पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी लोकसंगीत, देवदेवतांचे आशीर्वाद आणि पवित्रतेचे प्रतीक असलेल्या फुलांची वृष्टी आणि पारंपरिक महाआरती करण्यात आली. यावेळी मेस्सीनेही मंदिरातील महाआरतीमध्येही सहभाग घेतला. त्याने अंबे माता पूजा, गणेश पूजा, हनुमान पूजा आणि शिवाभिषेक केला. सर्व जीवांबद्दल आदर राखण्याच्या भारताच्या कालातीत नीतिमूल्यांनुसार त्याने जागतिक शांतता आणि एकतेसाठी प्रार्थनाही केली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : चलो बुलावा आया है...लिओनेल मेस्सी देवीच्या भक्तीत तल्लीन झाला, 'जय माता दी'चे दिले नारे
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement