IND vs SA : टीम इंडियाच्या खेळाडूचं बॅड लक, संधी मिळणारच होती, पण बीसीसीआयने 'घात' केला

Last Updated:

लखनऊच्या एकाना स्टेडिअमवर रंगणारा चौथा टी20 सामना अखेर रद्द झाला आहे. मैदानात दाट धुके असल्या कारणाने हा सामना रद्द कराला लागला आहे. हा सामना रद्द झाल्यामुळे टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला मोठा धक्का बसला आहे.

ind vs sa 4t20i
ind vs sa 4t20i
India vs South Africa : लखनऊच्या एकाना स्टेडिअमवर रंगणारा चौथा टी20 सामना अखेर रद्द झाला आहे. मैदानात दाट धुके असल्या कारणाने हा सामना रद्द कराला लागला आहे. हा सामना रद्द झाल्यामुळे टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला मोठा धक्का बसला आहे. कारण या खेळाडूला लखनऊच्या टी20 सामन्यात खेळण्याची संधी चालून आली होती. पण बीसीसीआयच्या चुकीच्या नियोजनामुळे त्याचा घात झाला आहे. दरम्यान हा खेळाडू कोण आहे?हे जाणून घेऊयात.
हा खेळाडू दुसरा तिसरा कूणी नसून टीम इंडियाचा स्टार खेळाडू संजू सॅमसन आहे.संजू सॅमसन मागच्या तीन टी20 सामन्यापासून टीम इंडियात संधी मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे.पण शुभमन गिलला आऊट ऑफ फॉर्म असताना देखील त्याला संधी दिली जात आहे.यामुळे मागचे तीन सामने संजू बेंचवर बसला आहे.विशेष म्हणजे गिल सतत फ्लॉप होत असल्या कारणाने संजू सॅमसनला संधी द्यावी,अशी मागणी जोर धरत होती,पण अद्याप त्याला संधी देण्यात आली होती.
advertisement
दरम्यान आजच्या सामन्याच्या सुरुवातीला शुभमन गिलला पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली असती. पण हा सामना दाट धुक्यामुळे रद्द झाल्याने ही संधी मिळण्याआधीच बीसीसीआयच्या चुकीच्या नियोजनामुळे हिरावली गेली.
दरम्यान मागच्या 18 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात शुभमन गिलला एकही अर्धशतक करता आलेलं नाही. टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या फक्त 7 मॅच शिल्लक आहेत, त्यातच शुभमन गिलची ही कामगिरी टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी आहे. आता पाचव्या टी20 मध्ये शुभमन गिलला संधी मिळते की संजूला खेळण्याची संधी मिळते? हे पाहावे लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : टीम इंडियाच्या खेळाडूचं बॅड लक, संधी मिळणारच होती, पण बीसीसीआयने 'घात' केला
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement