विठ्ठलभक्तांसाठी आनंदवार्ता! कार्तिकी एकादशीनिमित्त आदिलाबाद- पंढरपूर विशेष रेल्वे, असं असेल वेळापत्रक
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागामार्फत आदिलाबाद - पंढरपूर विशेष रेल्वे 9 अतिरिक्त डब्यांसह धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागामार्फत मिळालीये.
पंढरपूर: कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात होणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागामार्फत आदिलाबाद - पंढरपूर विशेष रेल्वे 9 अतिरिक्त डब्यांसह धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागामार्फत 3 नोव्हेंबर रोजी प्रसिद्धी परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
कार्तिकी एकादशी साठी मोठ्या संख्येने वारकरी विठुरायाच्या दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल होतात. वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता सोलापूर रेल्वे विभागामार्फत 4 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत गाडी क्रमांक 07613 आदिलाबाद - पंढरपूर विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. ही गाडी आदिलाबादहून सकाळी 08:30 मिनिटाला निघेल आणि दुसऱ्या दिवशी पंढरपूरला रात्री 12 वाजता पोहोचेल.
advertisement
तर उलट दिशेने गाडी क्रमांक 07614 हे पंढरपूर होऊन रात्री 8 वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी 12 वाजून 15 मिनिटाला आदिलबादला पोहोचेल.तर याच रेल्वेमध्ये गाडीमध्ये अतिरिक्त 9 डबे वाढवण्यात आले आहे. 2 स्लीपर कोच आणि सात सामान्य द्वितय श्रेणी डबे वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागामार्फत घेण्यात आला आहे.
आदिलाबाद - पंढरपूर विशेष रेल्वे गाडी सुधारित संरचना: 1 AC - 3 टायर,4 स्लीपर क्लास,13 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 लगेज काम गार्डच्या ब्रेक व्हॅन असे एकूण 20 डब्यांची संरचना आदीलाबाद पंढरपूर विशेष रेल्वे गाडीमध्ये करण्यात आली आहे. प्रवाशांनी वैद्य तिकिटासह या विशेष गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 03, 2025 9:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विठ्ठलभक्तांसाठी आनंदवार्ता! कार्तिकी एकादशीनिमित्त आदिलाबाद- पंढरपूर विशेष रेल्वे, असं असेल वेळापत्रक


