Uddhav Thackeray: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार का? उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांचं नाव घेत लगावला भाजपला टोला
- Published by:Sachin S
Last Updated:
जालना : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार हेक्टरी मदत द्या, कर्जमाफी करा या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. "फडणवीस सुद्धा एक्सिडेंटल मुख्यमंत्री आहे नाहीतर दाढीवाला मुख्यमंत्री झाला असता", असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसंच, अमित ठाकरे महापौर होणार का, या अफवेचा उगम संघातून झाला. अहमदाबादचं नाव बदलण्यासाठी मोदी-शहांना महापौर करणार अशी संघामध्ये चर्चा सुरू आहे, असा टोमणाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त दौऱ्यावर आहे. बीड, धाराशिवमध्ये पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार आसुड ओढला.
यावर्षी पीक हाती लागला नाही. जमीन खरडून गेली. मुख्यमंत्री म्हणले होते ७/१२ कोरा करणार. ही वेळ आता आहे. ७/१२ कोरा करण्याची. पण केंद्राचं पथक आलं कधी गेलं कधी कळलं सुद्धा नाही. पीक विमा तर एक थट्टा आहे. कर्जमाफी साठी जूनचा मुहूर्त काढालंय मग तोपर्यंत कर्जाचे हप्ते फेडायचे नाही का? ३१८०० कोटींचा पॅकेज जाहीर केलं. ही सगळ्यात इतिहासातील मोठी थाप आहे. सरकारचं ढोंग सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
advertisement
'हो मी एक्सीडेंटल मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्र फडणवीस आणि जो एक्सीडेंट केला आहे त्याचं काय? देवेंद्र फडणवीस सुद्धा एक्सीडेंटल मुख्यमंत्री आहे नाहीतर दाढीवाला मुख्यमंत्री झाला असता, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.
आदित्य महापौर महापौर होणार का?
या बातमीचा उगम कुठून झाला हे मला कळून घ्यायचं आहे आणि मला ते कळलं. या अफवेचा उगम संघातून झाला. १० वर्ष झाली मोदी पंतप्रधान आहे, अमित शाह हे गृहमंत्री झाले. पण त्यांच्या अहमदाबाद शहराचं नाव बदलू शकले नाही. त्यामुळे अहमदाबादचं नाव बदलायचं आहे ही संघातली अंदरकी बात आहे आणि त्यासाठी मोदी किंवा शहाला अहमदाबादचा महापौर बनवावा लागेल. महाराष्ट्रात अहमदनगरचं अहिल्यानगर केलंय, तसंच अहमदाबादचं नाव का बदलं नाही, १० वर्ष झाली आहे. त्यामुळे आता मला बघायचं आहे महापौर अमित शाह होणार की नरेंद्र मोदी होणार, असा मिश्किल टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
advertisement
'भाजप नव्हे भ्रष्टाचारी जनता पार्टी'
यातून काहीच निष्पन्न होणार नाही. पार्थ पवार, मुरलीधर मोहोळ, सरनाईक यांचं काय होणार? सरनाईक तर पैशांच्या बॅग घेऊन बसले होते, असे व्हिडीओ समोर आले होते. पण पुढे काहीच होणार नाही. मुळात
भ्रष्टाचारी जनता पार्टी भ्रष्टाचार केलेल्या लोकांना भाजप सोबत घेतंय. सगळ्यांना धुवून काढलं जात आहे, त्यांना वंदे मातरम् बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
November 08, 2025 6:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार का? उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांचं नाव घेत लगावला भाजपला टोला


