IND vs AUS : 'तु पुन्हा हरलास'! 4 टॉस हरल्यानंतर बुमराहने कॅप्टन सूर्याची घेतली फिरकी, गंभीरसोबत मैदानात सगळेच हसले, VIDEO

Last Updated:

सूर्या नेहमीप्रमाणे टॉस हरला. नंतर जसप्रीत बुमराहने मैदानात त्याला टॉस हरल्याचे विचारताच मैदानात एकच हशा पिकला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

ind vs aus 5th t20i
ind vs aus 5th t20i
India vs Australia 5th t20i : ब्रिस्बेनच्या गाबाच्या मैदानावर पार पडणारा पाचवा टी20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पाच सामन्यांची टी20 मालिका 2-1 ने भारताने जिंकली आहे. पण अवघ्या पाच ओव्हरपर्यंत पार पडलेल्या या सामन्यात काही रेकॉर्ड झाले तर काही किस्से देखील घडले आहेत. यातला एक किस्सा प्रचंड चर्चेत आहे. तो म्हणजे सूर्या नेहमीप्रमाणे टॉस हरला. नंतर जसप्रीत बुमराहने मैदानात त्याला टॉस हरल्याचे विचारताच मैदानात एकच हशा पिकला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
advertisement
खरं तर टॉस दरम्यानचा हा व्हिडिओ आहे.भारतीय खेळाडू मैदानात प्रॅक्टीस करत होते. तर तिकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टॉस पार पडला. हा टॉस नेहमी प्रमाणे सूर्यकुमार हरला.त्यानंतर ज्यावेळेस तो सुर्या गंभीरसोबत बोलत असताना मैदानावर असलेल्या जसप्रीतने त्याला तु पुन्हा हरलास असे म्हणताच,त्याचा चेहरा थोडाला पडला आणि नंतर त्याने त्याला हसून रिप्लाय दिला. दरम्यना हा किस्सा पाहून मैदानात सगळेच खेळाडू हसत सुटले.
advertisement
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करताना भारताची सूरूवात चांगली झाली होती. भारताचे शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे दोन्हीही सलामीवीर यांनी डावाला चांगली सूरूवात करून दिली होती. भारत ज्यावेळेस 4.5 ओव्हरमध्ये 54 धावा करून खेळत होता,त्यावेळेस मैदानात पावसाची एंन्ट्री झाली आणि सगळा खेळ बिघडला. या दरम्यान अभिषेक शर्मा 23 आणि शुभमन गिल 29 धावांवर नाबाद राहिला होता.
advertisement
दरम्यान नंतर पुढे सामना सूरु होण्याची शक्यता कमी होती त्यामुळे सामना रद्द करण्यात आला आणि भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका 2-1 ने जिंकली.
चालू दौऱ्यात भारताने ऑस्ट्रेलियात आठपैकी सात टॉस गमावले. शुभमन गिलने तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये टॉस गमावला तर सूर्यकुमारने पाच टी-२० सामन्यांमध्ये फक्त एक टॉस जिंकला. आणि उरलेले चार टॉस गमावले होते.
advertisement
गाब्बा टी20 साठी भारताचा प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
advertisement
गाब्बा टी20 साठी ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन: मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस आणि अॅडम झम्पा
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : 'तु पुन्हा हरलास'! 4 टॉस हरल्यानंतर बुमराहने कॅप्टन सूर्याची घेतली फिरकी, गंभीरसोबत मैदानात सगळेच हसले, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement