मतदानाच्या आदल्या रात्री अहिल्यानगर हादरलं, निवडणूक हिंसाचारात पाच जखमी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
काही ठिकाणी गुन्हे दाखल होत असताना, काही प्रकरणं मात्र आपापसातच मिटवली जात असल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
साहेबराव कोकणे
अहिल्यानगर : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असतानाच शहरात राजकीय हिंसाचाराने उग्र रूप धारण केलं आहे. पैशांच्या वाटपाच्या वादातून आणि पक्षीय संघर्षातून झालेल्या तुफान हाणामारीत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. काही ठिकाणी गुन्हे दाखल होत असताना, काही प्रकरणं मात्र आपापसातच मिटवली जात असल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
advertisement
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर अवघ्या काही तासांत शहरातील वातावरण तापलं. प्रभाग क्रमांक 15 सह विविध भागांत सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हिंसाचारात सिद्धांत देवकर, आर्यन एकाडे, स्वाती गाडळकर, अभिजित दळवी आणि हिमांशु जाधव हे पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री 15 ते 17 जणांनी एका तरुणावर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या गटाकडूनही मारहाण करण्यात आली. काही ठिकाणी चाकू हल्ल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या प्रकरणी भाजप उमेदवार दत्ता गाडळकर आणि शिवसेनेच्या उमेदवारांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
advertisement
कोतवाली पोलीस ठाणे विकले गेले आहे का?
सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांचा सर्रास वापर होत आहे, नगरमध्ये किरकोळ भांडणार नाही 360 लावला जात आहे उलट जे लोक मारतात त्यांनाच पोलीस संरक्षण देत आहे आणि मार खाणाऱ्या माणसावर ती गुन्हे दाखल होत आहे याबाबत न्यायालयात जाणार असल्यासही राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी सत्ताधाऱ्यांवर गुंडगिरी आणि पोलीस दडपशाहीचे आरोप केले आहेत. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजीव भोर यांनी जाणीवपूर्वक आपल्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला असून, कोतवाली पोलीस ठाणे विकले गेले आहे का? असा थेट सवाल उपस्थित केला
advertisement
निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता
भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनीही उमेदवारांच्या कुटुंबांवर हल्ले होत असल्याचा आरोप करत, प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.मात्र पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत ज्या प्रमाणात आहेत त्याप्रमाणे दखल घेतली आहेत जर स्थानिक पोलिसांनी ऐकलं नाही त्यांनी माझ्यापर्यंत यावं त्यांना न्याय दिला जाईल असंही पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी सांगितला आहे. अहिल्यानगरमध्ये मतदानाच्या अवघ्या काही तास आधी घडलेल्या या घटनांमुळे अहिल्यानगरमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, निवडणूक प्रक्रियेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 5:34 PM IST








