Petrol vs Diesel Car : पेट्रोल की डिझेल कोणती कार देते जास्त मायलेज? प्रत्येक कार मालकाला माहिती पाहिजेत 'या' गोष्टी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर तुम्हीही नवीन कार घेण्याच्या विचारात असाल आणि पेट्रोल-डिझेलच्या या गणितात अडकला असाल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. सामान्यतः आपण सर्वांनीच ऐकलं असेल की, डिझेल गाड्या पेट्रोल गाड्यांपेक्षा जास्त मायलेज देतात. पण यामागे नक्की काय कारण आहे? चला सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मग पेट्रोल कार का खरेदी करावी?जर डिझेल कार जास्त मायलेज देते, तर लोक पेट्रोल कार का घेतात? याची काही महत्त्वाची कारणे आहेत:कमी किंमत: पेट्रोल कारची मूळ किंमत डिझेल कारपेक्षा 1 ते 2 लाखांनी कमी असते.कमी देखभाल (Maintenance), पेट्रोल इंजिनमध्ये डिझेलच्या तुलनेत कमी सुटे भाग असतात, त्यामुळे त्यांचा मेंटेनन्स स्वस्त असतो.पेट्रोल इंजिन डिझेलपेक्षा कमी आवाज करते आणि व्हायब्रेशन्सही कमी असतात.
advertisement
कार मालकांनी लक्षात ठेवण्याच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी:1. जर तुमचा रोजचा प्रवास 40-50 किमी पेक्षा जास्त असेल, तरच डिझेल कार घेणे परवडते. अन्यथा, पेट्रोल आणि डिझेल कारच्या किमतीतील फरक भरून काढण्यासाठी तुम्हाला अनेक वर्षे लागतील.2. शहरातील ट्रॅफिक: जर तुम्ही फक्त ऑफिसला जाण्यासाठी शहरात गाडी वापरत असाल, तर पेट्रोल कार जास्त सोयीची ठरते. डिझेल इंजिन हायवेवर जास्त चांगले मायलेज देते.3. पुनर्विक्री मूल्य (Resale Value): काही वर्षांपूर्वी डिझेल गाड्यांना चांगली रिसेल व्हॅल्यू मिळत असे, पण आता इमिशन नियमांमुळे (BS6) डिझेल गाड्यांची रिसेल व्हॅल्यू कमी होऊ लागली आहे.
advertisement










