त्या टेम्पोत ड्रग्जचा साठा, पोलिसांना टीप मिळाली, सापळा रचून कारवाई, तब्बल 13 कोटींचं ड्रग्ज जप्त

Last Updated:

Shrirampur News: श्रीरामपूर तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील खंडाळा-दिघी रस्त्यावरून ड्रग्सची तस्करी होणार असल्याच्या माहितीवरून श्रीरामपूर पोलीस पथकाने सापळा रचत मुद्देमाल ताब्यात घेतला.

श्रीरामपूर पोलीस
श्रीरामपूर पोलीस
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १३ कोटी ७५ लाख रूपये किमतीचा अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या ड्रग्सचा साठा जप्त केलाय. याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील खंडाळा-दिघी रस्त्यावरून ड्रग्सची तस्करी होणार असल्याच्या माहितीवरून श्रीरामपूर पोलीस पथकाने सापळा रचत एक संशयित टॅम्पो अडवला. पोलिसांची ही शंका खरी ठरली.
या वाहनातून अन्न आणि औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित असलेला अल्प्राझोलम नामक पदार्थाच्या २१ गोण्या जप्त केल्या. या कारवाईत ७० किलो वजनाच्या तब्बल १३ कोटी ७५ लाख रुपये किमतीच्या ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपूर पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय..
advertisement

नेमकं प्रकरण काय, अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला काय म्हणाले?

काल संध्याकाळी आपल्याला अशी माहिती मिळाली की, श्रीरामपूरच्या आद्यौगिक वसाहतीत अमली पदार्थाची वाहतूक होणार आहे. पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. छोटा हत्ती टेम्पोमध्ये २१ गोण्या अमली पदार्थाचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे. एका आरोपीला अटकही करण्यात आले आहे. पुढील तपास श्रीरामपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिवपुजे करीत आहेत, अशी माहिती अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
त्या टेम्पोत ड्रग्जचा साठा, पोलिसांना टीप मिळाली, सापळा रचून कारवाई, तब्बल 13 कोटींचं ड्रग्ज जप्त
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement