'फक्त रिटायरमेंटचं नावच केलं अन्...' अजितदादांचा पुन्हा शरद पवारांवर हल्लाबोल
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अहमदनगर, साहेबराव कोकणे, प्रतिनिधी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून यावेळी पुन्हा एकदा भाजपनं सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सुजय विखे यांच्या प्रचार्थ कर्जतमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार
अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. '80 वर्षांच्या पुढे गेल्यानंतर इतरांना संधी दिली पाहिजे, इतरांना संधी कधी मिळणार? राज्य सरकारमध्ये 58 वर्षांचा कामगार झाला की तो निवृत्त होतो. भारतीय जनता पक्षात 75 वर्षांचा झाल्यानंतर बहुतेकवेळा निवृत्तीचा विचार होतो. पण यांनी फक्त रिटायर व्हायचं नावच केलं. आम्ही आता साठीच्या पुढे गेलो, आम्ही आणखी किती दिवस थांबायचं? असा खोचक टोला अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांना लगावला आहे.
advertisement
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही कधी कोणत्या कामात कमी आहोत का? तर नाही. आम्ही विकास कामं करतो का तर करतो, आमची प्रशासनावर पकड आहे का तर आहे. आमच्या स्वतःच्या बारामती तालुक्याचा कशा पद्धतीने काय पालट केला हे तुम्हाला माहिती आहे, पिंपरी चिंचवड पंचवीस वर्षे माझ्या ताब्यामध्ये होता, माझ्या विचारांच्या लोकांच्या ताब्यामध्ये होता त्याचा चेहरा मोहरा बदलून ठेवला असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Location :
Ahmadabad,Ahmadabad,Gujarat
First Published :
May 10, 2024 1:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
'फक्त रिटायरमेंटचं नावच केलं अन्...' अजितदादांचा पुन्हा शरद पवारांवर हल्लाबोल


