त्र्यंबकेश्वरला निघालेले साधू चहा प्यायला थांबले, अज्ञातांनी पाठलाग करून केली मारहाण, अहिल्यानगरमधली घटना
- Published by:Suraj
Last Updated:
त्र्यंबकेश्वरला निघालेल्या चार साधूंना अहिल्यानगरमध्ये मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अहिल्यानगर : संगमनेरमध्ये चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडलीय. साडेचारच्या सुमारास नवीन नगर रस्त्यावर कुटे हॉस्पिटलजवळ हा प्रकार घडला. मारहाणीत जखमी झालेल्या साधूंवर घुलेवाडी इथल्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. साधू त्र्यंबकेश्वरला जात असताना त्यांना मारहाण करण्यात आलीय. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चार साधू त्र्यंबकेश्वरला निघालले होते. ते चहा घेण्यासाठी नवीन नगर परिसरात उतरले. चहा घेतल्यानंतर ते निघाले असताना काही जण आडवे आले. त्यांनी तुम्ही इकडे कसे काय आलात असं विचारत मारहाण करायला सुरुवात केली. साधूंना चार ते पाच जणांनी मारहाण केली. लाथा बुक्क्या मारण्यात आल्या. मारहाण करणारे हे हिंदी भाषेत बोलत होते असंही मारहाण झालेल्या साधूंनी सांगितलंय.
advertisement
मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण सुरू असताना साधू जीव वाचवण्यासाठी पळत होते. तेव्हा त्यांचा पाठलाग करून मारहाण कऱण्यात आली. या प्रकारानंतर बजरंग दल, विहिंपसह हिंदुत्ववादी संघनांनी निषेध व्यक्त केला आहे. तसंच या प्रकरणी लवकर कारवाई करावी अशी मागणी केलीय.
पोलिसांनी सांगितले की, साधूंना मारहाण करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तणावाची स्थिती निर्माण करू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2024 8:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
त्र्यंबकेश्वरला निघालेले साधू चहा प्यायला थांबले, अज्ञातांनी पाठलाग करून केली मारहाण, अहिल्यानगरमधली घटना


