अहमदनगरमध्ये उंट उधळला, क्षणात 2 मुलांसह तिघे खाली कोसळले; थरकाप उडवणारा Video
- Written by:Sahebrao Kokane
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ahmednagar News : या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. उंट चालवणाऱ्याच्या डोक्याला उंटाचा पाय लागला. त्यानंतर हातगाडी चालक आणि उंट चालवणाऱ्यामध्ये किरकोळ वाद झाला.
अहमदनगर : उंटावर बसून लहान मुलांना गल्लीत फिरवत असताना उंट अचानक उधळल्याने त्यावर बसलेले तिघेही खाली कोसळले. उंटावर दोन मुलं आणि उंट हाकणारा असे तिघे बसले होते. खाली पडल्यानं त्यातील एक मुलगा किरकोळ जखमी झाला. अहमदनगर शहरातील जेजे गल्लीमध्ये ही घटना घडली.
अहमदनगर शहरातील जेजे गल्लीमध्ये उंट चालवणारा लहान मुलांना उंटावर बसून फिरवत होता. त्यावेळी तिथून नारळाची हातगाडी घेऊन एकजण जात होता. गल्लीमध्ये उंट वळत असताना मागून हातगाडीचे चाक उंटाच्या पायाला लागले. चाक पायाला लागल्याबरोबर उंट उधळला, त्यानं थेट उड्या मारायला सुरू केल्या आणि तेथून धावत जावू लागला. यामुळे उंटावरील तिघेही खाली कोसळले.
advertisement
उंट उधळला, उंटावर बसलेले दोन चिमुकले खाली पडून जखमी; घटना सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/Cuez2wOYOw
— News18Lokmat (@News18lokmat) February 22, 2024
या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. उंट चालवणाऱ्याच्या डोक्याला उंटाचा पाय लागला. त्यानंतर हातगाडी चालक आणि उंट चालवणाऱ्यामध्ये किरकोळ वाद झाला. पण, शहरी भागात वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे प्राणी फिरवणे योग्य आहे का असा प्रश्न उद्भवतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2024 9:30 AM IST
मराठी बातम्या/अहमदनगर/
अहमदनगरमध्ये उंट उधळला, क्षणात 2 मुलांसह तिघे खाली कोसळले; थरकाप उडवणारा Video










