Loksabha : महायुतीच्या अडचणी वाढणार? जागा न सोडल्याने आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक, दिला इशारा

Last Updated:

शिर्डीची जागा आठवलेंना सोडावी अन्यथा आरपीआय शिर्डी आणी अहमदनगर दक्षिण मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

News18
News18
हरिश दिमोठे, शिर्डी : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता पहिल्या टप्प्यातील उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. तर उर्वरित टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील काही उमेदवारांवर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यासाठी महायुती, महाआघाडीत चर्चा सुरू आहेत. दरम्यान, सोलापूर आणि शिर्डी मतदारसंघाची जागा आठवले गटाला न सोडल्याने आठवले गट महायुतीवर नाराज झाला आहे. महायुतीने आरपीआय आठवले गटाला शिर्डी आणी सोलापूरची जागा न सोडल्याने आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
शिर्डीची जागा आठवलेंना सोडावी अन्यथा आरपीआय शिर्डी आणी अहमदनगर दक्षिण मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले सुरूवातीपासून शिर्डी मतदारसंघासाठी आग्रही होते. मात्र ही जागा शिवसेनेला देण्यात आली असून उमेदवारही जाहीर करण्यात आला आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्ते आजही आग्रही असून श्रीरामपूर येथे निर्धार मेळावा घेत शिर्डीचा उमेदवार बदलावा आणी हि जागा आठवलेंना सोडली जावी अशी मागणी करत आक्रमक झाले आहेत.
advertisement
आरपीआय आठवले गटाच्या अस्तीत्वाची ही निवडणूक आहे. राज्यात महायुतीला निवडून येण्यासाठी आरपीआयच्या मतांची गरज आहे. त्यामुळे शिर्डी आणी सोलापूरची जागा आठवले गटाला दिली जावी अशी मागणी आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी दिलीय. जर जागा सोडली नाही तर अहमदनगर दक्षिण आणी शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय.
रामदास आठवले यांची यासंदर्भातील नाराजी दूर झाली आहे. पण कार्यकर्ते मात्र उमेदवारीसाठी आक्रमक झाले आहेत. आरपीआयच्या अस्तित्वासाठी निवडणूक लढण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निर्धार मेळावे घेतले जाणार आहेत. आठवले गटाच्या निर्धार मेळाव्यानंतर जर त्यांनी उमेदवार उभे केले तर यामुळे महायुतीच्या अडचणी वाढू शकतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Loksabha : महायुतीच्या अडचणी वाढणार? जागा न सोडल्याने आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक, दिला इशारा
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement