Sainagar Shirdi: शिर्डी ते काकीनाडा एक्स्प्रेस बाबत मोठी अपडेट, तिकीट बुक करण्याआधी हे वाचा

Last Updated:

Sainagar Shirdi Kakinada Express: शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी एक खूशखबर आहे. आता साईनगर शिर्डी ते काकीनाडा एक्सप्रेसबाबत रेल्वेने मोठी घोषणा केलीये.

Sainagar Shirdi: शिर्डी ते काकीनाडा एक्स्प्रेस बाबत मोठी अपडेट, तिकीट बुक करण्याआधी हे वाचा
Sainagar Shirdi: शिर्डी ते काकीनाडा एक्स्प्रेस बाबत मोठी अपडेट, तिकीट बुक करण्याआधी हे वाचा
मुंबई: साईनगर शिर्डी ते काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस लवकरच नव्या रुपात धावणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून ही एक्स्प्रेस आता नव्या आणि सुधारित संचरनेत असणार आहे. ट्रेनचमध्ये तीन वातानुकूलित शयनयान श्रेणींबरोबरच तृतीय इकॉनॉमी आणि सामान्य डब्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा अनुभव घेता येईल.
काकीनाडा एक्स्प्रेस नव्या रुपात
शिर्डी – काकीनाडा एक्स्प्रेसला एक प्रथम वातानुकूलित डबा, दोन द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, दोन तृतीय इकॉनॉमी, पाच शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे, एक द्वितीय आसन व्यवस्था व सामान गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार अशी सुधारित रचना असेल.
advertisement
नव्या रुपात कधीपासून धावणार?
साईनगर शिर्डी काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस (क्र. 17205) ही गाडी 14 ऑक्टोबर 2025 पासून सुधारित संरचनेसह शिर्डीहून रवाना होईल. तर ट्रेन क्रमांक 17206 ही काकीनाडा पोर्ट ते साईनगर शिर्डी एक्सप्रेस 13 ऑक्टोबर 2025 पासून काकीनाडा पोर्टहून धावणार आहे.
दरम्यान, साईनगर शिर्डी ते काकीनाडा पोर्ट एक्सप्रेसच्या नव्या रुपामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक आरामादायी आणि सुखकर होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Sainagar Shirdi: शिर्डी ते काकीनाडा एक्स्प्रेस बाबत मोठी अपडेट, तिकीट बुक करण्याआधी हे वाचा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement