6 हिंदू उमेदवारांनी AIMIM कडून मारलं रान, भाजपच्या बालेकिल्ल्यातही मिळवला विजय
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षाने शहरी भागात आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आपला राजकीय विस्तार केला आहे.
२०२६ च्या महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. यामध्ये सर्वात लक्षवेधी कामगिरी ठरली ती 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' अर्थात AIMIM या पक्षाची. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने शहरी भागात आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आपला राजकीय विस्तार केला आहे. विशेष म्हणजे, आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेत (BMC) एमआयएमने पहिल्यांदाच विजय संपादन करत इतिहास रचला आहे.
राज्यभरात ११२ नगरसेवक
२०२६ च्या या महापालिका निवडणुकांमध्ये AIMIM ने संपूर्ण महाराष्ट्रात ११२ पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नांदेड, धुळे, सोलापूर, नागपूर आणि अमरावती यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये पक्षाने आपली ताकद वाढवली आहे. या यशामुळे राज्यातील पारंपरिक राजकीय समीकरणं बदलली असून अनेक महापालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी AIMIM हा 'किंगमेकर'च्या भूमिकेत गेला आहे.
advertisement
केवळ मुस्लीम नव्हे हिंदू अन् बौद्ध उमेदवारही निवडून आणले
या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे AIMIM कडून केवळ मुस्लीम उमेदवारच निवडून आले नाहीत. तर ओवेसींच्या पक्षाकडून निवडणूक लढवलेले ६ हिंदू आणि बौद्ध उमेदवार देखील विजयी झाले आहेत. त्यामुळे एमआयएमला आता मुस्लीम बहुल भागा पलीकडे जाऊन प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये ३३ जागा जिंकून AIMIM ने भाजपच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला. येथे काकासाहेब काकडे (SC), अशोक हिवराले आणि विजयश्री जाधव यांनी विजय मिळवला. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात AIMIM ने ६ जागांवर विजय मिळवला. त्यात पवन कोये (ST) आणि वर्षा डोंगरे या दोन हिंदू उमेदवारांच्या विजयाची मोठी चर्चा आहे. याशिवाय मुंबईत ८ जागा जिंकून पक्षाने पहिल्यांदाच खातं उघडले. गोवंडी-शिवाजी नगर परिसरातून विजय उबाले या दलित समुदायातील शिक्षणतज्ज्ञाने मिळवलेला विजय ऐतिहासिक ठरला.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 2:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
6 हिंदू उमेदवारांनी AIMIM कडून मारलं रान, भाजपच्या बालेकिल्ल्यातही मिळवला विजय









