Ajit Pawar Plane Crash: आमचे दादा गेले...बारामतीकर ढसाढसा रडले, हॅास्पिटलवरचा Video
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ajit Pawar Death Hospital Video: जित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते.
Ajit Pawar Plane Crash: पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून सगळ्याच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. बारामतीमध्येच अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. अपघाताचे वृत्त समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते. विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यामुळे अजित पवारांसह त्यांच्यासोबत असणारे वैमानिक, सहकाऱ्यांचेही निधन झाले आहे.
advertisement
अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर बारामतीकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विमान अपघातामधील प्रवाशांना रुग्णालयात आणल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात एकच गर्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले नाहीत.
अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. विशेषतः अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द लक्षवेधी राहिली. सलग अनेक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सिंचन, जलसंपदा, अर्थ आणि नियोजन यांसारख्या खात्यांमध्ये त्यांनी धाडसी निर्णय घेतले. काही निर्णयांवरून ते वादातही सापडले, मात्र प्रशासकीय पकड असलेला नेता म्हणून त्यांची प्रतिमा कायम राहिली.
advertisement
इतर संबंधित बातमी:
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 10:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash: आमचे दादा गेले...बारामतीकर ढसाढसा रडले, हॅास्पिटलवरचा Video









