Dhanajay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून धसांचा युटर्न, अजितदादांच्या नेत्याने कारणच सांगितलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
संतोष देशमुख यांच्या हत्तेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी, त्यांचा खटला फास्ट्र ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. धस मुख्यमंत्री यांनाही भेटले अजितदादाना भेटले, हा त्यांचा प्रश्न आहे, पण महायुतीत असताना महायुतीचे भान ठेवावे.
Amol Mitkari On Suresh Dhas : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आले होते.त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांनी धनंजय मुडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मागणीत भाजप आमदार सुरेश धस देखील आघाडीवर होते. पण आता त्यांनी एका मुलाखतीत मी राजीनाम्याची मागणी केलीच नसल्याचे विधान करत युटर्न घेतला आहे.या धसांच्या युटर्नवरून आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना चागलेच धारेवर धरले आहे.
अमोल मिटकरी माध्यमांशी बोलत होते. यावेळी सुरेश धस यांनी यूटर्न घेतल्यावर अमोल मिटकरी यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं धसांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं, नंतर त्यांनी राजीनामा मागितला नाही, अशी दुटप्पी भूमिका धस यांची असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. आता अजूनही त्यांनी आरोप प्रत्यारोप सुरूच ठेवले तर आम्हाला नाईलाजाने सर्व गोष्टी बाहेर काढाव्या लागतील असा इशाराही मिटकरी यांनी धस यांना दिला. त्यामुळे आता धस बॅकफूटवर का आले हे त्यांनाच विचारा? असा सल्लाही मिटकरी यांनी माध्यमांना दिला आहे.
advertisement
संतोष देशमुख यांच्या हत्तेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी, त्यांचा खटला फास्ट्र ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. धस मुख्यमंत्री यांनाही भेटले अजितदादाना भेटले, हा त्यांचा प्रश्न आहे, पण महायुतीत असताना महायुतीचे भान ठेवावे. ते आमच्यावरही टीका करतात, पण कोणाकडे बोट दाखवताना त्यांनी भान ठेवावे. कोणाकडे बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे असतात असा टोला मिटकरींनी यांनी धसांना लगावला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 08, 2025 4:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhanajay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून धसांचा युटर्न, अजितदादांच्या नेत्याने कारणच सांगितलं


