Nashik News : 'भाजप बाटलेला पक्ष, त्यांचे आयुष्य...', अजितदादांच्या शिलेदाराचा बोचरा वार, नाशिकचं राजकारण तापलं

Last Updated:

Manikrao Kokate Hit back to BJP : भाजप हा बाटलेला पक्ष असून त्यांचे आयुष्य इतरांचे पक्ष फोडण्यातच गेला असल्याचा बोचरा वार अजित पवार गटाच्या नेत्याने केला आहे.

'भाजप बाटलेला पक्ष, त्यांचे आयुष्य...', अजितदादांच्या शिलेदाराचा बोचरा वार, नाशिकचं राजकारण तापलं
'भाजप बाटलेला पक्ष, त्यांचे आयुष्य...', अजितदादांच्या शिलेदाराचा बोचरा वार, नाशिकचं राजकारण तापलं
नाशिक: राज्यातील नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यावर पोहोचत असताना आरोप–प्रत्यारोपांची मालिका अधिक तीव्र झाली आहे. विशेषत: नाशिकच्या सिन्नर नगरपरिषद निवडणूक रिंगणात महायुतीतील अंतर्गत कलह उघडपणे समोर आला आहे. या निवडणुकीत भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट या तिन्ही घटक पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजप हा बाटलेला पक्ष असून त्यांचे आयुष्य इतरांचे पक्ष फोडण्यातच गेला असल्याचा बोचरा वार अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला आहे.
राज्यभरातील नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आरोप आणि प्रत्यारोपाने चांगलाच गाजतोय. या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत कलह चांगलाच विकोपाला गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या सिन्नर नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे यांची शिवसेना एकमेकांच्या समोर उभी ठाकली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल राजे उगले यांच्या प्रचारार्थ सिन्नर मध्ये आयोजित सभेत महायुतीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विरोधी पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत असताना मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षावरही सडकून टीका केली.
advertisement

माणिकरावांचा भाजपवर बोचरा वार...

माणिकराव कोकाटे यांनी आपल्या भाषणात भाजपवर हल्ला बोल केला. भाजपने विधानसभा निवडणुकीत माझ्या घरातील व्यक्ती फोडला, आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्ती फोडला. भाजप हा पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे. फोडा फोडीत भाजपचे आयुष्य चालले असून, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र घरी बसले आहे अशी जळजळीत टीका कोकाटे यांनी केली. इतकचं नाही तर आपल्याला खोटं बोलता येत नाही, म्हणून माझं खातं बदललं पण मी दादांचा पठ्ठ्या आहे. आपला वादा पक्का आहे असेही कोकाटे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik News : 'भाजप बाटलेला पक्ष, त्यांचे आयुष्य...', अजितदादांच्या शिलेदाराचा बोचरा वार, नाशिकचं राजकारण तापलं
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement