महिलांना मेट्रो आणि PMPML बस प्रवास मोफत, पिंपरी चिंचवडकरांसाठी अजितदादांचे हमीपत्र

Last Updated:

अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

अजित पवार
अजित पवार
पुणे : अजित पवार यांच्या नेतृत्वात झेपावलेले पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या ताब्यात गेल्याने ते पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. २०१७ पर्यंत अजित पवार यांचे शहरावर एकहाती वर्चस्व होते. मात्र तत्कालिन आणि आताचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सूक्ष्म रणनीती आखून अजित पवार यांचे वर्चस्व ठरवून मोडित काढले. अजित पवार यांच्याच एकेकाळच्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये आणून फडणवीस यांनी आव्हान उभे केले. दरम्यानच्या पाच वर्षात पुलाखालन बरेच पाणी वाहून गेले आहे. सध्या सत्तेत एकत्र असले तरी पिंपरी चिंचवड महापालिका आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी विरुद्ध भाजपमध्ये निकराची लढाई होत आहे.
अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला. महत्त्वाचे म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना मेट्रो आणि PMPML बस प्रवास मोफत करण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

पिंपरी चिंचवडकरांसाठी अजितदादांचे हमीपत्र

मेट्रो व पीएमपीएमएल बस प्रवास मोफत - कामगार, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा.
महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना मोफत/सवलतीचे आरोग्य उपचार, हायटेक महापालिका रुग्णालये.
advertisement
शिक्षणाला प्राधान्य - सुसज्ज मॉडेल शाळा, डिजिटल सुविधा, विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना.
महिला सक्षमीकरण - सुरक्षित शहर, रोजगार प्रशिक्षण, स्वयंरोजगाराला चालना.
कामगार व मध्यमवर्गासाठी न्याय - मूलभूत सुविधा, सामाजिक सुरक्षा, मालमत्ता करमुक्त.
स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक शहर - कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, हरित क्षेत्र वाढ.
नळाद्वारे पाणीपुरवठा, मजबूत ड्रेनेज व रस्ते - पायाभूत सुविधांचा वेगवान विकास.
advertisement
स्मार्ट सिटी उपक्रम - स्मार्ट ट्रॅफिक, सीसीटीव्ही, ई-गव्हर्नन्स.
घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसन - सर्वांसाठी सुरक्षित निवारा.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना - आरोग्य, विरंगुळा व सन्मान.
पिंपरी चिंचवडचा विकास म्हणजे केवळ घोषणा नाही, तर अंमलबजावणीची हमी.
जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या ठोस आराखड्यावर उभं राहिलेलं हे हमीपत्र म्हणजेच प्रगतीचा संकल्प.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महिलांना मेट्रो आणि PMPML बस प्रवास मोफत, पिंपरी चिंचवडकरांसाठी अजितदादांचे हमीपत्र
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement