अजितदादांच्या निष्ठावन शिलेदाराचे अपहरण, गाडीतून फरफटत नेलं अन्..., निवडणुकीच्या तोंडावर खळबळ

Last Updated:

कामानिमित्त घराबाहेर पडले असताना चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

News18
News18
नांदेड : नांदेड शहरात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली असून अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि निष्ठावन शिलेदार जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने काही तासांतच त्यांची सुटका करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्याने  या प्रकरणामुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास नांदेडच्या सिडको परिसरात ही घटना घडली. जीवन घोगरे पाटील हे कामानिमित्त घराबाहेर पडले असताना चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सिडको भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून त्याचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.
advertisement

अपहरणानंतर बेदम मारहाण

अपहरणानंतर जीवन घोगरे पाटील यांना अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणीमुळे ते गंभीररीत्या जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली असून ते सध्या सुरक्षित असल्याची माहिती आहे. घटनेनंतर जीवन घोगरे पाटील यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
advertisement

दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी

या अपहरणामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून वैयक्तिक वाद, राजकीय वैमनस्य की अन्य काही कारण याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच घटनास्थळाच्या परिसरात सखोल चौकशी करून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्याचे अपहरण झाल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या निष्ठावन शिलेदाराचे अपहरण, गाडीतून फरफटत नेलं अन्..., निवडणुकीच्या तोंडावर खळबळ
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement