Ajit Pawar Plane Crash : अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू, विमान कंपनीवर गंभीर आरोप, दुसऱ्यांदा....
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ajit Pawar Death: या अपघातात अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त असणाऱ्या विमान कंपनीवर आता गंभीर आरोप होऊ लागले आहेत. याच कंपनीच्या विमानाचा आधीदेखील अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी येत असताना सकाळीच अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला. लँडिंग करत असताना विमानाचा भीषण अपघात होऊन स्फोट झाला. या अपघातात अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त असणाऱ्या विमान कंपनीवर आता गंभीर आरोप होऊ लागले आहेत. याच कंपनीच्या विमानाचा आधीदेखील अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांनी एक्स (ट्विटर)वर केलेल्या ट्विटमध्ये संबंधित विमान VSR Aviation कंपनीच्या मालकीचे असल्याचे म्हटले. सेठ यांनी आपल्या ट्विटमध्ये या कंपनीवर गंभीर आरोप करत, यापूर्वीही या कंपनीच्या विमानाचा अपघात झाल्याचे म्हटले आहे. तसेच, या चार्टर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सुहेल सेठ यांनी कंपनीच्या मालकांवर गंभीर आरोप केले. आपल्या ट्वीटमध्ये सुहेल सेठ म्हणाले की, आज सकाळी जो विमान अपघात झाला ते विमान VSR Aviation च्या मालकीचे होते. ही कंपनी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या कंपनीच्या दुसऱ्या विमानाचा अपघात झाला आहे. पिता-पुत्र ही कंपनी चालवत असून ते लोकांना DGCA India हे आमच्या खिशात आहे असे सांगतात. ही चार्टर विमान कंपनी बंद झाली पाहिजे असे सेठ यांनी म्हटले.
advertisement
Apparently VSR Aviation which own the aircraft that crashed this morning have been habitual offenders and this is their second plane crash. It’s a father-son company and informed people say they have @DGCAIndia in their pocket. This charter should be shut down @RamMNK
— SUHEL SETH (@Suhelseth) January 28, 2026
advertisement
तेहसीन पुनावाला यांनीदेखील ट्वीट केले. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये याच कंपनीच्या विमानाचा यापूर्वी अपघात झाला असल्याचे म्हटले आहे. अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते. ते विमान VSR Aviation चे होते. कंपनीचे दुसरे विमान क्रॅश झालं असल्याचं त्यांनी म्हटले. मागील काही वर्षात विमान आणि हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहेत. यात आता डीजीसीएने लक्ष घालून कठोर पावले उचलण्याची मागणी पुनावाला यांनी केली.
advertisement
The plane in which Ajit Pawar ji was flying was operated by VSR Aviation ! This is the second plane crash. Over the past year we have seen many aircraft & chopper crashes in India. DGCA needs to be pulled up & hauled up!
Om Shanti 🙏
— Tehseen Poonawalla Official 🇮🇳 (@tehseenp) January 28, 2026
advertisement
२०२३ सालीही झाला होता असाच अपघात
VSR Ventures Learjet 45 aircraft VT-DBL हे खासगी विमान मुंबईत १४ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई विमानतळावर कोसळले होते. खराब हवामानाचं कारण देत हा विमान अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात ३ जण जखमी झाले होते. या विमानाचा अपघातही लँडिंग करताना झाले होते. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 1:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash : अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू, विमान कंपनीवर गंभीर आरोप, दुसऱ्यांदा....









