भाजपच्या नाकावर टिच्चून अजितदादांचा मलिकांसाठी प्रचार, प्रवीण दरेकर म्हणाले...

Last Updated:

Ajit pawar Campaign For Nawab Malik: नवाब मलिक यांच्या उमेदवारीने बॅकफूटला गेलेल्या भाजपने मध्यममार्ग काढून त्यांच्यासाठी प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

नवाब मलिक आणि अजित पवार
नवाब मलिक आणि अजित पवार
मुंबई : भारतीय जनता पक्षाचा प्रचंड विरोध असतानाही, त्यांचा विरोध डावलून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक आणि त्यांची लेक सना मलिक यांच्या निवडणूक प्रचाराला हजेरी लावली. सना मलिक यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत अजित पवार सहभागी झाले होते.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी नवाब मलिक यांना देऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रचंड दबाव आणला होता. मलिक यांच्यावर गंभीर आरोप असल्याने त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू नये, आमचा त्यांना विरोध असेल, अशी भूमिका भाजपने जाहीर केलेली होती. परंतु भाजपचा आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांचा विरोध डावलून अजित पवार यांनी नवाब मलिक यांना पद्धतशीरपणे शेवटच्या क्षणाला तिकीट देऊन एबी फॉर्मही दिला.
advertisement
नवाब मलिक यांच्या उमेदवारीने बॅकफूटला गेलेल्या भाजपने मध्यममार्ग काढून ते जरी राष्ट्रवादीचे उमेदवार असले तरी आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करू, अशी भूमिका घेतली. मात्र गुरूवारी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मलिक यांच्या प्रचारासाठी रॅलीला उपस्थित राहून भाजपला आव्हान दिले.
अणुशक्ती नगरच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार सना मलिक आणि मानखुर्द गोवंडीचे उमेदवार नवाब मलिक यांच्या प्रचारार्थ अजित पवार आज गोवंडी टाटा नगर परिसरातून रॅली करत आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला घेऊन युतीमध्ये जोरदार विरोध होता. तरी नवाब मलिक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यात आता खुद्द अजित पवार हेच प्रचारात उतरल्यामुळे युतीत नाराजी होण्याची शक्यता बळावली आहे.
advertisement
अजित पवार यांची मलिकांसाठी रॅली, भाजपची दुसऱ्या मिनिटाला प्रतिक्रिया
नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असल्याने आमचा त्यांना पाठिंबा नाही, हे आम्ही याआधीच जाहीर केले आहे. सना मलिक महायुतीच्या उमेदवार असल्याने त्यांचा प्रचार करण्यात काही गैर नाही. नवाब मलिकांना आमचा पाठिंबा नाही, हे आम्ही कित्येक वेळा सांगितले आहे. सना मलिक महायुतीच्या उमेदवार असतील तर त्यांना समर्थन देणे आमचे काम आहे, असे भाजपच्या वतीने प्रवीण दरेकर यांनी सांगितले. तसेच या गोष्टीमुळे आमच्या युतीत बाधा येणार नसल्याचेही दरेकर यांनी आवर्जून सांगितले.
advertisement
सना मलिक विरुद्ध फहाद अहमद यांच्यातील लक्षवेधी लढत
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून सना मलिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनीही अणुशक्तीनगरमध्ये जोरदार प्रचार सुरू केला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपच्या नाकावर टिच्चून अजितदादांचा मलिकांसाठी प्रचार, प्रवीण दरेकर म्हणाले...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement