advertisement

तू विकास कुठे केलाय ते तरी मला दाखव, फडणवीसांच्या खास आमदाराला अजितदादांनी सुनावले

Last Updated:

प्रचार सभेसाठी आले असता दौंड हेलीपॅड ते गांधी मैदान सभेच्या स्थळी जात असताना अजित पवार यांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीमुळे सभास्थळी पोहोचण्यासाठी उशीर होत होता. त्यामुळे ते चक्क ताफा सोडून चालत राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत सभास्थळी पोहोचले.

राहुल कुल-अजित पवार
राहुल कुल-अजित पवार
दौंड (पुणे) : बारामती पाहिली की कोल्हापुरातील लोक राहायला येतात. मात्र दौंडमधील व्यापारी दौंड सोडून गेले हे कुणाचे अपयश आहे? तू विकास कुठे केलाय ते तरी मला दाखव, अशी विचारणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार राहुल कुल यांना केली. अशा लोकांना तुम्ही का निवडून देता? असे विचारीत नगरपरिषदेला तरुण तडफदार उमेदवार दिले आहेत. त्यांच्यामागे दौंडकरांनी उभे राहा, विकास काय असतो ते दाखवतो, असे अजित पवार म्हणाले.
दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार शहरात आले होते. प्रचार सभेसाठी आले असता दौंड हेलीपॅड ते गांधी मैदान सभेच्या स्थळी जात असताना अजित पवार यांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीमुळे सभास्थळी पोहोचण्यासाठी उशीर होत होता. त्यामुळे ते चक्क ताफा सोडून चालत राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत सभास्थळी पोहोचले. भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार राहुल कुल यांच्यावर तोफ डागली.
advertisement

अजित पवार यांचा भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा

बारामतीचे एसटी स्टँड पहा आणि दौंडचे स्टँड पहा. अशा लोकांना का संधी देता? दौंडचे व्यापारी शहर सोडून गेले हे कुणाचे अपयश आहे? यावेळी नगरपालिकेला मी तरुणांना संधी देताना अनुभवी लोकांनाही तिकीट दिले आहे. आल्यापासून 'अजिदादा आगे बढो' अशा घोषणा सुरू आहेत. मी नक्की पुढे जाईल फक्त तुम्ही घडाळ्याचे बटन दाबा, असे अजित पवार म्हणाले. तसेच दौंडमध्ये विद्या प्रतिष्ठानची शाखा आम्ही सुरू करणार आहोत. त्यामुळे संधीचे सोने करायचे की राख करायची तुम्ही ठरवा, असे म्हणत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
advertisement

दौंडमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम सुरू, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी

दौंडमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम सुरू आहे. पण ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी आहेत, असा इशारा अजित पवार यांनी राहुल कुल यांना दिला. पोलिसांना सांगतो हे तीन पक्षाचे सरकार आहे. कायदा कुणी हातात घेत असेल त्याला कायदा काय असतो हे दाखवून द्या. दौंडमध्ये कोण दमदाटी करीत असेल तर कायद्याने त्याला जरब बसलाच पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
advertisement

मी सभास्थळी चालत आलो, आप्पा सांगे-दादा ऐके!

माजी आमदार रमेश थोरात यांच्यावर अजित पवार यांचा विशेष विश्वास आहे. रमेश थोरात यांनी सांगितलेले मी ऐकतोच, असे मतदारांना सांगताना हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर आप्पांनी पायी मला सभास्थळी आणले. आप्पांनी सांगायचे आणि दादाने ते ऐकायचे, असे अजित पवार म्हणाले. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री माझ्या ओळखीचा आहे, आपल्याला निधी देईल. आता मला पाहायचे आहे तुमचे लक्ष आहे का? असेही मिश्किलपणे अजित पवार म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तू विकास कुठे केलाय ते तरी मला दाखव, फडणवीसांच्या खास आमदाराला अजितदादांनी सुनावले
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement