रवी राणांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांचे बंधू बिनविरोध जिंकले
- Published by:Ravindra Mane
- Reported by:SANJAY SHENDE
Last Updated:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखलदरा येथील राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे.
संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखलदरा येथील राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र निवडणूक व्हायच्या आधीच आल्हाद कलोती यांचा विजय झाला आहे. ते बिनविरोध निवडून आले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती १७ तारखेला चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाची अर्ज दाखल केला होता. ते फडणवीसांचे बंधू असल्याने ही निवडणूक कशी होणार? ते स्वबळावर निवडणूक लढवणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इकडे ताकद लागणार याबाबत उत्सुकता होती. मात्र अर्ज दाखल केल्याच्या तिसऱ्याच दिवशी आल्हाद कलोती यांची बिनविरोध निवड झाली आहे.
advertisement
काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख जमील शेख, नथ्थू खडके आणि नामदेव खडके यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे ही निवडणूक बिनविरोध ठरली. आल्हाद कलोती यांची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बडनेराचे आमदार रवी राणा यांनी फिल्डिंग लावल्याचं सांगितलं जातं. ही निवडणूक बिनविरोध होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून आमदार रवी राणा यांना शुभेच्छा दिल्या.
advertisement
आल्हाद कलोती नक्की कोण आहेत?
स्थानिक सूत्रांनुसार, आल्हाद कलोती हे चिखलदरा येथील सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय राहिले आहेत. स्थानिक स्तरावर त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. तसेच ते देवेंद्र फडणवीसांचे नातेवाईक असल्याने परिसरात त्यांचं राजकीय वजन देखील आहे. ते निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने ही निवडणूक चुरशीची ठरेल, असं बोललं जात होतं. मात्र त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
November 20, 2025 1:57 PM IST


