Amravati: अमरावतीमध्ये तृतीयपंथीयांसोबत धक्कादायक प्रकार, किन्नरांनी थेट खासदारांकडे घेतली धाव
- Published by:Sachin S
- Reported by:SANJAY SHENDE
Last Updated:
अमरावतीमध्ये पुन्हा एकदा धर्मांतराचा प्रकार समोर आला आहे. यावेळी हा प्रकार तृतीयपंथीयांमध्ये घडला असल्याचं समोर आलं आहे.
अमरावती: अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तृतीयपंथीयांचा बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवैध आणि बळजबरीने धर्मांतरण करण्याचे मोठ्या रॅकेट अमरावती सक्रिय असल्याचा आरोप भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.
अमरावतीमध्ये पुन्हा एकदा धर्मांतराचा प्रकार समोर आला आहे. यावेळी हा प्रकार तृतीयपंथीयांमध्ये घडला असल्याचं समोर आलं आहे. तृतीय पंथीयांचं बळजबरीने धर्मांतरण केल्याप्रकरणी अमरावतीतील तृतीयपंथी थेट खासदार अनिल बोंडे यांच्या कार्यालयात पोहोचले. या तृतीयपंथीयांनी आपल्यासोबत घडलेली हकीकत अनिल बोंडे यांच्याकडे मांडली.
नेमकं प्रकरण काय?
तृतीयपंथीयांच्या महामंडलेश्वर आखाडांच्या प्रमुख माँ मातंगी नंदगिरी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचं मुस्लिम धर्मात धर्मांतरण केलं होतं. मात्र धर्मांतर नंतर किन्नरावर वारंवार अत्याचार होत असल्याने पुन्हा रेखा पाटील उर्फ महामंडलेश्वर आखाडांच्या प्रमुख माँ मातंगी नंदगिरी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कुंभमेळ्यात विधीवत हिंदू धर्मात प्रवेश केला. मात्र, तुम्ही पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारा यासाठी काही मुस्लिम किन्नरांनी हिंदू किन्नरांवर तलवारी आणि मिरची पावडर डोळ्यात टाकून हल्ला केला, असा आरोप किन्नरांनी केला. त्यामुळे किन्नरामध्ये भीतीचे वातावरण आहे.
advertisement
अमरावती जिल्ह्यातिल दोन तुतीय पंथीयांचं मुस्लिम धर्मांत धर्मांतरण केल्याचा आरोप आहे. बजरंग टेकडीवरुन काही दिवसांपूर्वी भांडण झालं ते धर्मांतरांवरून झालं होतं. एक मौलवी आहे जो अमरावती येथील किन्नरांना मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करून घेतलं, असा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला. तसंच, या प्रकरणी पोलिसांनी दखल घ्यावी आणि तात्काळ हल्ले करणाऱ्या किन्नरावर कारवाई करण्याची मागणी, खासदार बोंडे यांनी केली.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
November 15, 2025 5:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amravati: अमरावतीमध्ये तृतीयपंथीयांसोबत धक्कादायक प्रकार, किन्नरांनी थेट खासदारांकडे घेतली धाव


