36 व्या वर्षी लग्न झालं, 3 तासात नवरी पळाली, बीडच्या तरुणासोबत झाला गेम, नक्की काय घडलं

Last Updated:

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका ३६ वर्षीय तरुणाला एका तरुणीने दोन लाखांना गंडा घातला आहे.

News18
News18
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका ३६ वर्षीय तरुणाला एका तरुणीने दोन लाखांना गंडा घातला आहे. तरुणीने लग्नासाठी दोन लाख घेत लग्न केलं. मात्र लग्नानंतर अवघ्या तीनच तासात तिने घरातून धूम ठोकली. मात्र हा सगळा प्रकार लक्षात येताच तरुणाच्या नातेवाईकांनी पाठलाग करत तरुणीला पकडलं आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस चौकशीत तरुणीचा धक्कादायक कांड उघडकीस आला आहे.
सूरज (नाव बदललं आहे) असं या नवरदेवाचं नाव असून प्रीती शिवाजी राऊत असं अटक केलेल्या नवरीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर प्रल्हाद गुळभिले नावाच्या एजंटने 1 डिसेंबरला सूरजला फोन केला होता. लग्नासाठी मुलगी असल्याची माहिती दिली होती. दुसऱ्याच दिवशी एजंटने सूरजकडून १० हजारांची मागणी केली. यानंतर लॉजमध्ये राहण्यासाठी आणि लग्नाच्या खरेदीच्या नावाखाली आरोपींनी सूरजकडून १ लाख ९० हजार रुपये घेतले. ६ डिसेंबरला लग्नाची तारीख धरली.
advertisement
६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता दिपे वडगाव येथील हनुमान मंदिरात सूरज आणि प्रीतीचं लग्न लावून दिलं. त्यानंतर नवरीला घेऊन वऱ्हाड कोदरी येथे परतलं. घरात नवीन सून आली म्हणून घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र हा आनंद अवघे तीन तास टिकला. कारण सायंकाळी ४ वाजता प्रीतीने शौचाला जाण्याचा बहाणा केला आणि घरातून पळ काढला. तिला पळताना गावातील एका व्यक्तीने पाहिले आणि आरडाओरड केली.
advertisement
नातेवाईकांनी पाठलाग करून तिला पकडलं. यावेळी तिने पोलिसांना फोन करून आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर तिचं बिंग फुटलं. प्रीतीने तिची मावशी सविता (रा. पुणे), माया सतीश राऊत (रा. चाकण) आणि एजंट प्रल्हाद गुळभिले यांनी संगनमत करून ही फसवणूक केल्याचं कबूल केलं.
फसवणूक करण्यासाठी या टोळीने पूर्णपणे प्लॅन आखला होता. लग्नाआधीच प्रीती राऊत हिचं नाव बदलून पतीच्या नावासह बनावट आधार कार्ड तयार केलं होतं. मात्र नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे ही टोळी पोलिसांच्या कचाट्यात सापडली आहे. या टोळी राज्यात इतरही तरुणांना अशाप्रकारे गंडा घातला आहे का? याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
36 व्या वर्षी लग्न झालं, 3 तासात नवरी पळाली, बीडच्या तरुणासोबत झाला गेम, नक्की काय घडलं
Next Article
advertisement
Pune News : साडे चार तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर आरोपांचा बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळबळ
४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब
  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

View All
advertisement