Amit Salunkhe: ज्याच्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय, त्या अमित साळुंखेला झारखंड पोलिसांकडून अटक का?

Last Updated:

Amit Salunkhe: झारखंड सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवाईने ऐन पावसात राजकीय वातावरण आणखीच तापवलं आहे. अमित साळुंखे या व्यावसायिकाला गुरुवारी अटक करण्यात आली. त्यानंतर मोठी खळबळ उडाली.

ज्याच्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय, त्या अमित साळुंखेला अटक का?
ज्याच्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय, त्या अमित साळुंखेला अटक का?
मुंबई: गुरुवारी झारखंड पोलिसांनी केलेल्या एका कारवाईमुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. राज्यात आधीच महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात उलटफेर होणार असल्याची चर्चा सुरू असताना झारखंड सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवाईने ऐन पावसात राजकीय वातावरण आणखीच तापवलं आहे. अमित साळुंखे या व्यावसायिकाला गुरुवारी अटक करण्यात आली. त्यानंतर मोठी खळबळ उडाली.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना मोठा गौप्यस्फोट केला. अमित साळुंखे हा सुमित फॅसिलिटीचे संचालक आहे. राज्यातील '108 रुग्णवाहिका' घोटाळ्याचा हा सूत्रधार आहे. 800 कोटींचा हा घोटाळा आहे. त्याशिवाय, हा अमित साळुंखे हा 'श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशन'चा आर्थिक कणा आहे. अमित साळुंखेने घोटाळ्याचा पैसा या फाऊंडेशनकडे वळवला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप राऊत यांनी केला. संजय राऊतांच्या या आरोपाने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं.
advertisement

अमित साळुंखेला अटक का?

झारखंडमध्ये सध्या मद्य विक्री घोटाळा गाजत आहे. उत्पाद शुल्क विभागात झालेल्या या घोटाळ्याने झारखंड सरकारला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आलैी होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी कारवाई करत प्रशासकीय अधिकाऱ्यांना अटक केली आहे. अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. झारखंड दारू घोटाळ्यात आतापर्यंत आयएएस अधिकारी विनय कुमार चौबे यांच्यासह 11 आरोपींना अटक केली आहे. मे 2022 मध्ये छत्तीसगड मॉडेल धर्तीवर दारू विक्री सुरू झाली होती. त्यातूनच हा दारू घोटाळा उघड झाला. त्यात सुमित फॅसिलिटीचे अमित साळुंखेला अटक करण्यात आली आहे.
advertisement
झारखंडमधील बहुचर्चित दारू घोटाळ्याप्रकरणी ‘सुमित फॅसिलिटी’ या कंपनीचे संचालक अमित साळुंखे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. साळुंखे हा छत्तीसगडमधील मद्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानियाचा निकटवर्तीय मानला जातो. सिंघानियावर सुरू असलेल्या चौकशीतूनच साळुंखेवर कारवाई करण्यात आली आहे. आता साळुंखेच्या चौकशीतून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

इतर संबंधित बातमी:

advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amit Salunkhe: ज्याच्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय, त्या अमित साळुंखेला झारखंड पोलिसांकडून अटक का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement