पोलिसांना पाहताच त्याने स्वत:चा गळा कापला, अमरावतीतील चक्रावून टाकणारा प्रकार

Last Updated:

अमरावती जिल्ह्याच्या नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं एका ५५ वर्षीय व्यक्तीनं पोलिसांना पाहताच स्वत:च्या गळ्यावर वार केले आहेत.

Ai generated Photo
Ai generated Photo
अमरावती जिल्ह्याच्या नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं एका ५५ वर्षीय व्यक्तीनं पोलिसांना पाहताच स्वत:च्या गळ्यावर वार केले आहेत. हा हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. हा सगळा प्रकार पाहून पोलीस देखील घाबरले. त्यांनी तातडीने संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा सगळा प्रकार सोमवारी सकाळी अमरावतीतील यास्मिननगर परिसरात घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शेख अकील शेख गफूर (५५, रा. यास्मिननगर, गल्ली क्रमांक २) असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. सोमवारी सकाळी १०:३० च्या सुमारास गुन्हे शाखेचे कर्मचारी मंगेश लोखंडे आणि सतीश देशमुख हे अवैध दारु व्यावसाय प्रकरणी अकीलच्या घरी धाड टाकण्यासाठी गेले होते. पोलीस घरात शिरल्याने शेख अकीलने त्यांना विरोध केला. पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी शेख अकीलने अचानक धारदार शस्त्राने स्वतःचा गळा कापून घेतला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अकीलला पाहून परिसरात एकच गोंधळ उडाला.
advertisement
या घटनेनंतर शेख अकील यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. "शेख अकीलने मागील तीन महिन्यांपासून अवैध दारूचा व्यवसाय बंद केला असून तो सध्या रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. पोलिसांनी घरात शिरून त्याला मारहाण केली, त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले," असा दावा नातेवाइकांनी केला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.
advertisement

पोलीस प्रशासनाची भूमिका

दुसरीकडे, पोलीस सूत्रांनुसार शेख अकील याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. तो घरात अवैध दारु व्यवसाय चालवतो, असा संशय पोलिसांना होता. याच प्रकरणी धाड टाकण्यासाठी पोलीस पथक अकीलच्या घरी गेलं होतं. मात्र यावेळी पोलिसांना पाहून कारवाईच्या भीतीने अकीलने स्वत:चा गळा कापला. शेख अकील सध्या बेशुद्ध असल्याने त्यांचा जबाब नोंदवता आला नाही. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोलिसांना पाहताच त्याने स्वत:चा गळा कापला, अमरावतीतील चक्रावून टाकणारा प्रकार
Next Article
advertisement
Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement