Independence Day 2025: महाराष्ट्रातील असं गाव, स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही मोबाईल नेटवर्कने त्रस्त, अनेक समस्यांचा करावा लागतोय सामना Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
मेळघाटमधील अनेक गावांत अजूनही नेटवर्क पोहचले नाही. त्याठिकाणी जास्तीत जास्त BSNL चा वापर आहे. मोबाईलमध्ये रेंज दाखवत पण, कॉल आणि इतर कोणतीच क्रिया त्यातून नेहमी होत नाही.
अमरावती: भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन आहे. आजच्याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले. 1947 पासून आतापर्यंत अनेक बदल घडले. सद्यस्थितीमध्ये एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी मोबाईल हे उत्तम साधन आहे. हजारो मैल दूर असणाऱ्या व्यक्तींची देखील मदत आपण कॉल करून घेऊ शकतो. त्यामुळे खूप बाबी आता सोप्या झालेल्या दिसून येत आहेत. अनेक योजना, सोयीसुविधा आता मोबाईलच्या आधारावर आहेत. पण, यातही अनेकांना समस्या निर्माण होत आहे. आजही राज्यातील अनेक अशी गावं आहेत ज्याठिकाणी नेटवर्क पोहोचले नाही. त्यातीलच एक म्हणजे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट. मेळघाटमधील अनेक गावांत अजूनही नेटवर्क पोहोचले नाही. त्याठिकाणी जास्तीत जास्त BSNL चा वापर आहे. मोबाईलमध्ये रेंज दाखवते पण, कॉल आणि इतर कोणतीच क्रिया त्यातून नेहमी होत नाही. एखाद्या वेळी कॉल लागला तर लागला अन्यथा दुसरा पर्याय त्यांना शोधावा लागतो.
advertisement
मेळघाटमधील काटकुंभ गावातील ग्रामस्थांशी लोकल18ने चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, आमच्या इथे मोबाईल नेटवर्क आणि लाईटची खूप मोठी समस्या आहे. गावात BSNL चे टावर आहे. मोबाईलमध्ये रेंज दाखवते. मात्र, कॉल लागत नाही. BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो. पण, ते विविध कारणं सांगतात. कॉल कनेक्ट होत नसल्याने अनेक समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं आहे.
advertisement
कॉल लागत नसल्याने गरोदर महिलांच्या जीवाशी खेळ
काटकुंभ या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आजूबाजूच्या 8 ते 10 गावातील रुग्ण याठिकाणी आणले जातात. प्रत्येक 3 ते 4 किमी अंतरावर एक गाव आहे. काही गावं 15 ते 20 किमी देखील आहेत. त्या गावातून जर रुग्ण याठिकाणी आणायचा असेल तर अँब्युलन्स लागेल. अँब्युलन्स पाहिजे असल्यास कॉल कनेक्ट होणं महत्त्वाचं आहे. याठिकाणी नेटवर्क समस्या असल्याने कॉल लागत नाही. त्यामुळे रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचू शकत नाही. गरोदर महिलांना हा त्रास खूप घातक आहे. कॉल लागत नसल्यास अनेकवेळा एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन निरोप सांगावा लागतो. रस्ते व्यवस्थित नसल्याने जाण्यायेण्यात 1 तास जातो. इतका वेळ रुग्णांना उपचार मिळत नाही. त्यामुळे रुग्ण दगावण्याची भीती असते, असे ग्रामस्थ सांगतात.
advertisement
विद्यार्थ्यांना अभ्यासात समस्या
मेळघाटमधील अनेक मुलं अमरावती किंवा इतर ठिकाणीच शिक्षणासाठी आहेत. मात्र, काहींना जाणं शक्य होत नाही. त्यांना जर गावात राहून अभ्यास करायचा असेल? एखादा फॉर्म ऑनलाईन करायचा असेल तर याठिकाणी नेटवर्कच राहत नाही. त्यासाठी पैसे खर्च करून शहरात जावं लागते. अनेकदा विद्यार्थ्यांना पर्याय नसल्याने शिक्षण देखील सोडावं लागतं आहे. शाळेतही इंटरनेट नसल्याने विद्यार्थी अनेक गोष्टींपासून वंचित आहेत, असेही ते सांगतात.
advertisement
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
August 15, 2025 7:52 PM IST
मराठी बातम्या/अमरावती/
Independence Day 2025: महाराष्ट्रातील असं गाव, स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही मोबाईल नेटवर्कने त्रस्त, अनेक समस्यांचा करावा लागतोय सामना Video