Art Gallery : शेगावला जाताय? बौद्धिक दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूंच्या आर्ट गॅलरी द्या भेट, कलाकृती पाहून कराल कौतुक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव याठिकाणी महालक्ष्मी मंदिर सिद्धपीठ येथे मतीमंद मुलांची शाळा आहे. तेथील मुलांनी अनेक शोभेच्या वस्तू स्वतः बनवलेल्या आहेत. त्याची आर्ट गॅलरी त्याठिकाणी तयार केलेली आहे.
अमरावती : आविष्कार संस्थेद्वारे विदर्भात बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दोन विशेष शाळा चालविल्या जातात. त्यापैकी एक श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय शेगांव ही आहे. तर दुसरी कोहिनूर इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज्ड, नागपूर येथे चालविली जाते. श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय याठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्या माध्यमांतून विद्यार्थ्यांना विविध मातीच्या वस्तू, पेंटिंग आणि इतरही अनेक कलाकृती शिकवल्या जातात. त्यानंतर विद्यार्थी ते स्वतः बनवतात. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या अशाच काही वस्तूंची आर्ट गॅलरी ही शेगाव येथील महालक्ष्मी मंदिर श्री क्षेत्र सिद्धपिठ या ठिकाणी असलेल्या श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय याठिकाणी आहे.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. त्याठिकाणी महालक्ष्मी मंदिर सिद्धपिठ हे सध्या भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. त्याच ठिकाणी श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय सुद्धा आहे.
advertisement
तेथील आर्ट गॅलरीबाबत जाणून घेण्यासाठी लोकल 18 च्या प्रतिनिधीने तेथील शिक्षकांसोबत संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, याठिकाणी ही शाळा 2023 पासून सुरू झाली आहे. आमच्याकडे 6 ते 18 वयोगटातील 50 मुलं आहेत. ते मतिमंद असल्याने त्यांच्या भविष्यातील विचार करून त्यांना विविध आर्ट शिकवले जातात. त्यामध्ये मातीच्या वस्तू बनविणे. पेंटिंग तयार करणे, मूर्तीला कलर करणे अशाप्रकारचे शिकवणी वर्ग घेतले जातात. मुलांना याठिकाणी सर्व सोयी मोफत असतात. त्यांचे राहणे खाण्याची सोय सुद्धा याच ठिकाणी केली जाते.
advertisement
मुलांनी बनवलेल्या वस्तूंची आर्ट गॅलरी
आपण बघतो की, सर्वसाधारण व्यक्ती सुद्धा कधी ना कधी खचून जातो. तर मग ही तर मतिमंद मुलं आहेत. समाजात ही मुलं आपल्यासारखी मिसळू शकत नाही. तर मग त्यांचे भविष्य पुढे कसे असणार? यावर एक मार्ग म्हणून या मुलांना विविध कला शिकवल्या जातात. प्रत्येक मुलात काही ना काही सुप्त गुण हा असतोच. त्यामाध्यमातून तो पुढे जाऊन स्वतःचा काही व्यवसाय उभा करू शकतो. या उद्देशाने मुलांना या सर्व कला याठिकाणी शिकवल्या जातात. त्याच मुलांच्या कामाला प्रोत्साहन मिळण्यासाठी आम्ही इथे आर्ट गॅलरी तयार केली आहे.
advertisement
यामध्ये मुलांनी बनवलेल्या मातीच्या वस्तू, अगरबत्ती, 12 बलुतेदार, लाकडाच्या पेंट केलेल्या मूर्ती, टेराकोटा मातीपासून बनवलेले भांडी, तीन प्रकारच्या पोस्टर पेंटिंग या आर्ट गॅलरीमध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत. या मुलांच्या कलेचे कौतुक व्हावे यासाठी हा उपक्रम आम्ही राबवित आहे. गजानन महाराजांच्या दर्शनाला दिवसाला हजारो भक्त याठिकाणी येतात. त्याच लोकांनी आमच्या या मुलांच्या आर्ट गॅलरीला सुद्धा भेट द्यावी. त्यांच्या गुणांचा गौरव करावा हीच आमची अपेक्षा आहे, असे शिक्षिका म्हणाल्या.
advertisement
view comments
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
April 24, 2025 4:38 PM IST
मराठी बातम्या/अमरावती/
Art Gallery : शेगावला जाताय? बौद्धिक दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तूंच्या आर्ट गॅलरी द्या भेट, कलाकृती पाहून कराल कौतुक

