फलटणच्या घटनेची अमरावतीत पुनरावृत्ती, उच्चशिक्षित युवतीचा संशयास्पद मृत्यू, मध्यरात्री घडला प्रकार
- Published by:Ravindra Mane
- Reported by:SANJAY SHENDE
Last Updated:
Crime in Amravati: अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फलटणच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. इथं एका उच्चशिक्षित तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.
संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती: मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रात फलटण येथील महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. महिलेनं आपल्या तळहातावर पेनने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. या नोटमध्ये त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर अशा दोन नावांचा उल्लेख केला आहे. आत्महत्येसाठी एका पोलीस अधिकाऱ्यानेच प्रवृत्त केल्याचा आरोप असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
ही घटना ताजी असताना आता अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. इथं एका उच्चशिक्षित तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मध्यरात्री उशिरा तिने आयुष्य संपवल्याने या प्रकरणात संशय व्यक्त केला जातोय.
रणदीप कौर रियाड असं मृत आढळलेल्या २७ वर्षीय तरुणीचं नाव आहे. तिने एमएससीचं शिक्षण घेतलं होतं. तिचा घरातच संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मयत रणदीप कौर ही एका खासगी कोचिंग क्लासेसवर शिकवण्याचं काम करत होती. काल मध्यरात्री उशिरा तिने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे. तिने नेमकं कोणत्या कारणातून आत्महत्या केली? याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांना अद्याप सुसाईड नोट मिळाली नाही. या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुढील तपास बडनेरा पोलीस करत आहेत
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
October 26, 2025 2:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
फलटणच्या घटनेची अमरावतीत पुनरावृत्ती, उच्चशिक्षित युवतीचा संशयास्पद मृत्यू, मध्यरात्री घडला प्रकार


