पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवली, अनिषा माजगावकर संदीप देशपांडेंच्या भेटीला, काय चर्चा?

Last Updated:

अतिशय प्रतिष्ठेच्या लढतीत राजुल पाटील यांनी अनिषा माजगावकर यांचा पराभव झाला.

संदीप देशपांडे-राजुल पटेल
संदीप देशपांडे-राजुल पटेल
मुंबई : भांडुपमधून मनसेतून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढलेल्या मनसेच्या माजी नगरसेविका अनिषा माजगावकर यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची आज भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. अतिशय प्रतिष्ठेच्या लढतीत अनिषा माजगावकर यांचा पराभव झाला.
अनिषा माजगावकर इच्छुक असलेली जागा युतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला गेली होती. त्यामुळे अनिषा माजगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. भांडुपमधील प्रभाग क्र. ११४ मधून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात स्वबळावर उतरलेल्या अनिषा माजगावकर या सर्वाधिक मते मिळविणाऱ्या अपक्ष उमेदवार ठरल्या.
शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवार राजुल पाटील यांनी अनिषा माजगावकर यांना पराभूत केले. अनिषा माजगावकर यांना ८०५५ मते मिळाली. राजुल पाटील यांनी साडे तीन हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला.
advertisement
निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजगावकर यांनी मुंबई अध्यक्ष या नात्याने संदीप देशपांडे यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. निवडणूक आणि प्रचार काळातील अनुभव माजगावकर यांनी संदीप देशपांडे यांना सांगितले.

खासदारांच्या लेकीकडून माजगावकर यांचा पराभव

महापालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने माजगावकर यांनी बंडखोरी केली. मनसेने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु माजगावकर निवडणूक लढविण्यावर ठाम होत्या. शिवसेनेचे खासदार संजय दीना पाटील यांची मुलगी राजुल पाटील आणि माजगावकर यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली. या लढतीकडे मुंबईकरांचे लक्ष लागले होते. महापालिकेच्या २०१२ सालच्या निवडणुकीत अनिषा माजगावकर निवडून आल्या होत्या.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवली, अनिषा माजगावकर संदीप देशपांडेंच्या भेटीला, काय चर्चा?
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement