पार्थ पवार प्रकरणात अण्णा हजारेंची एन्ट्री, पवार कुटुंबाचे संस्कार काढले, फडणवीसांना 'कठोर' सल्ला

Last Updated:

Anna Hazare on Parth Pawar: पार्थ पवार जमीन घोटाळ्यावर राजकीय क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही संताप व्यक्त करीत दोषींवर कडक कारवाई करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

पार्थ पवार-अण्णा हजारे
पार्थ पवार-अण्णा हजारे
मुंबई : पुण्याच्या कोरेगावमधील ४० एकर जमिनीच्या खरेदीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजिव पार्थ पवार अडचणीत सापडले आहे. तब्बल १८०४ कोटी रुपये किंमतीची ही जमीन केवळ 300 कोटी खरेदी झाल्याचा समोर आले आहे. त्यातही प्रशासनाकडून २१ कोटींची स्टॅम्प ड्युटीही माफ करण्यात आल्यानं, या खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. या खरेदी व्यवहारात जो सावळा गोंधळ झाला, त्यावरून अनेक सवाल उपस्थित होतायेत. पार्थ पवार यांच्या उद्योगावरून विरोधकांकडून अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे नेते अण्णा हजारे यांनी सरकारला कठोर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ४० एकर जमिनीच्या व्यवहारावरुन पार्थ पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यांच्यामुळे अजित पवारही अडचणीत आले आहेत. पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या १ लाखांचे भाग भांडवल असलेल्या अमेडिया या कंपनीने तब्बल १८०४ कोटी रूपये किंमत असलेली जमीन, अवघ्या ३०० कोटींत खरेदी केली आहे. जी जमीन अमेडियाने खरेदी केली, ती महार वतनाची आहे. वतनाच्या जमिनी या अहस्तांतरीत असतात. तरीही हा व्यवहार झाल्याने बड्या व्यक्तीनेच सूत्रे हलविल्याचा संशय आहे. राजकीय क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
advertisement

मंत्र्याचं पोरगं चुकीचे वागत असेल तर तो मंत्र्याचा दोष

एखाद्या मंत्र्याचा मुलगा चुकीचे वागत असेल तर तो मंत्र्याचा दोष आहे. त्यासाठी संस्कार हे महत्त्वाचे असतात. एखादा व्यक्ती घडण्यासाठी कुटुंबाचे संस्कार, घराण्याचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात, असा हल्लाबोल अण्णा हजारे यांनी पवार कुटुंबावर केला. त्याचवेळी राळेगण सिद्धी किती मोठं गाव आहे, पण कधीही गडबड नाही. गोंधळ नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
advertisement

अॅक्शन प्लॅन तयार करा, अण्णा हजारेंचा सरकारला सल्ला

पार्थ पवार यांच्या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे. पण असले प्रकार केवळ कारवाई थांबणार नाही. अशा प्रकरणांविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारने विशेष धोरणे आखून त्याचा अवलंब केला पाहिजे. या प्रकरणाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. असे वागणाऱ्या लोकांना कडक शासन केले पाहिजे, असे ते म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पार्थ पवार प्रकरणात अण्णा हजारेंची एन्ट्री, पवार कुटुंबाचे संस्कार काढले, फडणवीसांना 'कठोर' सल्ला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement