Uddhav Thackeray : 'राष्ट्रपतींना आमंत्रण द्यायला तुम्ही काळाराम मंदिराचे ट्रस्टी का?', शिवसेनेचा ठाकरेंवर वार
- Published by:Shreyas
Last Updated:
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काळाराम मंदिराचं आमंत्रण दिलं, यावरून आता जोरदार राजकारण सुरू झालं आहे. राष्ट्रपतींना निमंत्रण द्यायला तुम्ही काय ट्रस्टी आहात का? असा सवाल शिवसेनेने उद्धव ठाकरेंना केला.
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काळाराम मंदिराचं आमंत्रण दिलं, यावरून आता जोरदार राजकारण सुरू झालं आहे. राष्ट्रपतींना निमंत्रण द्यायला तुम्ही काय ट्रस्टी आहात का? असा सवाल शिवसेनेने उद्धव ठाकरेंना केला, त्यावरून ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून नाशिकच्या काळाराम मंदिरात येण्याचं निमंत्रण दिलं आहे, यावरून शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ठाकरेंना टोला लगावला.
22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा होत असताना नाशिकमध्ये गोदावरीच्या तिरावर उद्धव ठाकरे आरती करणार आहेत. अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्याकरता राष्ट्रपतींना निमंत्रण देऊन त्यांच्याहस्ते प्रतिष्ठापना व्हावी, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याकरता संजय शिरसाट मैदानात उतरले.
advertisement
'राष्ट्रपती निमंत्रण देणारे तुम्ही कोण? काळाराम मंदिर म्हणजे तुम्हाला स्वत:ची प्रॉपर्टी वाटली का? त्या देशाच्या राष्ट्रपती आहेत, कधी यायचं त्याचा कार्यक्रम त्या ठरवतील. तुम्ही काळाराम मंदिराचे ट्रस्टी नाही त्यांना बोलवायला. तुम्ही स्वत: आयुष्यात पहिल्यांदा त्या काळाराम मंदिरात जात आहात. तुम्ही काय तिथले महंत आहात? ती ट्रस्ट तुमच्या नावावर आहे? तुम्ही कोण आहात? दुसऱ्याच्या घरात बोलावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? मीडियामध्ये स्टंटबाजी करण्याचा हा प्रकार आहे,' असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 14, 2024 11:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : 'राष्ट्रपतींना आमंत्रण द्यायला तुम्ही काळाराम मंदिराचे ट्रस्टी का?', शिवसेनेचा ठाकरेंवर वार