Dombivli: 'ती'च्यासोबत भांडण झालं, ऋषिकेश 4 तास समजावत होता;अखेर 11 व्या मजल्यावरून मारली उडी, डोंबिवलीतील घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
डोंबिवलीतील पश्चिम भागात ही घटना घडली. ऋषिकेश शर्विल परब (वय 21) असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे.
डोंबिवली: डोंबिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवली पश्चिमेत सुदामा इमारतीमध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरुणाने अकराव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील पश्चिम भागात ही घटना घडली. ऋषिकेश शर्विल परब (वय 21) असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. ऋषिकेश हा वंदे मातरम कॉलेजचा विद्यार्थी होता. तो सुदामा सोसायटीत राहत होता. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मैत्रिणीसोबत वाद झाल्यानंतर त्याने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. ऋषिकेश परब हा इमारतीतील 5 व्या मजल्यावर राहात होता. मात्र, त्याने 11 व्या मजल्यावर जाऊन उडी मारली.
advertisement
नेमकं काय घडलं?
ऋषिकेश परब हा सुदामा सोसायटीत राहत होता. आज सकाळी ८ वाजेपासून तो इमारतीच्या ११ व्या मजल्यावर जाऊन बसला होता. त्याचं त्याच्या मैत्रिणीसोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. बऱ्याच वेळ तो तिथेच बसलेला होता. त्यानंतर ११ वाजेच्या सुमारासा फायर डकमधून तो उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी सोसायटी बाहेर असलेल्या लोकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली. सकाळी ११.४६ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान सोसायटीत पोहोचले. सगळ्यांनी ऋषिकेशची समजूत काढली. पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, अखेरीस १२ वाजेच्या सुमारास ऋषिकेशने सोसायटीच्या फायर डकच्या खिडकीतून बाहेर उडी मारली. ११ व्या मजल्यावर खाली पडल्यामुळे ऋषिकेशला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
advertisement
घटनास्थळी पोलीस दाखल झाले, त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपास केल्यानंतर मैत्रिणीसोबत झालेल्या वादातून त्याने हे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
September 27, 2025 5:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dombivli: 'ती'च्यासोबत भांडण झालं, ऋषिकेश 4 तास समजावत होता;अखेर 11 व्या मजल्यावरून मारली उडी, डोंबिवलीतील घटना