IND vs PAK: फायनलच्या आधी फिटनेसने भारताचे टेन्शन वाढले, दोन स्टार्सवर दुखापतीचं सावट, खेळण्याबाबत अनिश्चितता
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Asia Cup Final: आशिया कप फायनलपूर्वी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. हार्दिक पांड्या आणि अभिषेक शर्मा यांच्या फिटनेसवर अजूनही अनिश्चिततेचं सावट आहे.
दुबई: आशिया कप 2025 च्या फायनल मॅचपूर्वी भारताच्या संघाचे टेन्शन वाढले आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर फायनल मॅच खेळली जाणार आहे. मात्र भारतासाठी धक्कादायक बातमी म्हणजे फॉर्मात असलेला अभिषेक शर्मा आणि संघाचा प्रमुख ऑलराऊंडर हार्दिक पांड्या यांच्या फिटनेसबाबत नवीन शंका उपस्थित झाली आहे.
advertisement
काल म्हणजे शुक्रवारी सुपर फोरमध्ये भारताची लढत श्रीलंकेविरुद्ध झाली. दोन्ही संघांच्या समान धावा झाल्याने ही लढत सुपर ओव्हरमध्ये गेली. भारताने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली आणि अजिंक्य राहिली. पण संघासाठी चिंतेचं कारण म्हणजे हार्दिक पांड्या पहिल्या षटकानंतर पुन्हा गोलंदाजीसाठी मैदानात उतरू शकला नाही आणि नंतर संपूर्ण सामना बाहेर बसला. त्याचबरोबर श्रीलंकेच्या डावातील दहाव्या षटकात अभिषेक शर्मालाही मैदान सोडावं लागलं.
advertisement
भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत या बाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की- दोघांनाही क्रॅम्प्स झाले होते. हार्दिकबाबत आज रात्री आणि उद्या (शनिवार) सकाळी तपासणी होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. पण हे स्पष्ट आहे की दोघांनाही क्रॅम्प्स झाले होते. अभिषेक मात्र पूर्णपणे ठीक आहे.
advertisement
हार्दिक पांड्याने या सामन्यात फलंदाजीत काही खास कामगिरी केली नाही. तो फक्त २ धावांवर (३ चेंडू) दुष्मंथ चमीरा याच्या अप्रतिम कॅच अॅण्ड बोल्डवर बाद झाला. गोलंदाजीत मात्र त्याने भारतासाठी डावाची सुरुवात केली आणि आपल्या पहिल्याच षटकात कुसल मेंडिसला चौथ्या चेंडूवर बाद केलं.
advertisement
दुसरीकडे अभिषेक शर्माने आपल्या तुफानी फॉर्मला कायम ठेवत आणखी एक अर्धशतक झळकावलं. त्याने 31 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. अखेरीस तो श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका याच्या गोलंदाजीवर बाद झाला.
advertisement
भारताला पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी या दोन्ही खेळाडूंची गरज आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा दोनदा सहज पराभव केला आहे. त्यामुळे अंतिम लढतीत भारत तिसऱ्यांदा विजय मिळवेल अशी सर्वांची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान यांची लढत तब्बल 41 वर्षांनंतर होणार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 5:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK: फायनलच्या आधी फिटनेसने भारताचे टेन्शन वाढले, दोन स्टार्सवर दुखापतीचं सावट, खेळण्याबाबत अनिश्चितता