Maharashtra Politics : 'बाळासाहेबांची 80 टक्के समाजसेवा तुम्ही बासनात गुंडाळली', भाजपचा ठाकरेंवर पलटवार

Last Updated:

मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करतात, पण तुम्ही पिकनिकला गेलात,असा टोला प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

pravin darekar, udhhav Thackeray
pravin darekar, udhhav Thackeray
Bjp vs Uddhav Thackeray : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा,हेक्टरी 50 हजार तातडीने जाहीर करून वाटप करा,अशी मागणी मी शेतकऱ्यांच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.यानंतर आता उद्धव ठाकरेंवर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करतात, पण तुम्ही पिकनिकला गेलात,असा टोला प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.तसेच बाळासाहेबांची 80 टक्के समाजसेवा तुम्ही बासनात गुंडाळली,अशी जळजळीत टीका देखील दरेकर यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, (उद्धव ठाकरे) ते डायलॉग मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत. मुख्यमंत्री असताना घरात बसून काम केलं. आणि 600 कोटींचा मुख्यमंत्री साहाय्यता निधी वापरला नाही. मराठवाड्यातील आपत्तीचे गांभीर्य तिन्ही नेत्यांना आहे.त्यामुळे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत करताय. पण तुम्ही पिकनिक करण्यासाठी गेलात.शेतकऱ्यांच्या प्रति तुमचं प्रेम पुतणा मावशीसारखं आहे,अशा शब्दात दरेकर यांनी ठाकरे यांना चिमटा काढला.
advertisement
उद्धव ठाकरेंना शेतीतील काही समजत नाही.ते स्वतः ही मान्य करतात. ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते,त्यांनी प्रशासन कधीच समजून घेतलं नाही आणि आमच्यावर टीका करतात.उद्धव ठाकरे यांना बोलायला अडवलं कुणी ? मुख्यमंत्र्यांनी सांगितले, त्यावर उत्तर द्या. वैयक्तिक आव्हाने देण्यापेक्षा मदत करा. आणि बाळासाहेबांची 80 टक्के समाजसेवा तुम्ही बासनात गुंडाळली,अशी टीका दरेकर यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच कर्जमाफीची आणि मदतीची प्रक्रिया सुरू आहे. अतिरिक्त मदतीसाठी काल मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटुन आहे आहेत.त्यामुळे प्रक्रिया वेगाने सूरू असून दिलासा देण्यासाठी सरकार सक्षम आहे,असे देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics : 'बाळासाहेबांची 80 टक्के समाजसेवा तुम्ही बासनात गुंडाळली', भाजपचा ठाकरेंवर पलटवार
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement