Jalgaon: राख गोळा करायला गेले, स्मशानभूमीतलं दृश्य पाहून नातेवाईक हादरले, गावात संतापाची लाट
- Published by:Sachin S
Last Updated:
स्मशानभूमीत सोनं चोरीच्या घटना याआधीही घडल्या होत्या. पण, सुमनबाई पाटील यांच्या अस्थी चोरीला गेल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
जळगाव: जळगावमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्मशानभूमीतून एका मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर महिलेची अस्थी आणि दागिन्यांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील स्मशान भूमीत तीन दिवसांपूर्वी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार झालेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगावरील सुमारे दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यासह अस्थी आणि राख अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार आज गुरुवारी उघडकीस आला. यावेळी मयत महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.
advertisement
शिरसोली प्र.न. येथील रहिवासी असलेल्या सुमनबाई चावदस पाटील यांचं मंगळवार दिनांक ९ डिसेंबर रोजी निधन झालं होतं. त्यांच्यावर बुधवार अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र तीन दिवसानंतर पारंपरिक विधी नुसार अस्थी घेण्यासाठी आज त्यांचे कुटुंबीय शिरसोलीच्या स्मशानभूमीत आले होते. पण या ठिकाणी मयत सुमनबाई पाटील यांच्या डोक्या खालील भागाची राख आणि अस्थी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
advertisement
तसंच, आणखी धक्कादायक बाब म्हणजे, सुमनबाई पाटील यांच्या अंगावरील सुमारे दीड ग्रॅमचे दागिने ही अज्ञात चोरट्यानं लंपास केलं आहे. या घटनेनंतर सुमन पाटील यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करून अज्ञात चोरट्याला पकडून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, अस्थिचोरी आणि दागिने चोरीच्या प्रकारामुळे शिरसोली परिसरात खळबळ उडाली आहे.
स्मशानभूमीत सोनं चोरीच्या घटना याआधीही घडल्या होत्या. पण, सुमनबाई पाटील यांच्या अस्थी चोरीला गेल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. अस्थी चोरण्याचं कारण काय होतं, अस्थी चोरीचा प्रकार कशासाठी केला. याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
December 11, 2025 5:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon: राख गोळा करायला गेले, स्मशानभूमीतलं दृश्य पाहून नातेवाईक हादरले, गावात संतापाची लाट







