Virat Kohli : विराटने इंग्लंडमधून मेल केला, भविष्याचा प्लान सांगितला, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं!

Last Updated:

बीसीसीआय, निवड समिती तसंच टीम मॅनेजमेंटने खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य केलं. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा स्थानिक क्रिकेट खेळणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

विराटने इंग्लंडमधून मेल केला, भविष्याचा प्लान सांगितला, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं!
विराटने इंग्लंडमधून मेल केला, भविष्याचा प्लान सांगितला, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं!
नवी दिल्ली : बीसीसीआय, निवड समिती तसंच टीम मॅनेजमेंटने खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य केलं. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा स्थानिक क्रिकेट खेळणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता विराट कोहलीने दिली आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये आपण खेळणार का नाही? हे विराट कोहलीने स्पष्ट केलं आहे. विराट कोहलीने दिल्ली क्रिकेट असोसिएशनला मेल करून याबद्दलची माहिती दिली आहे. विजय हजारे ट्रॉफीसाठी आपण उपलब्ध असल्याचं विराटने सांगितलं आहे, यानंतर विराटची दिल्लीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत निवड झाली आहे. विराटसोबत ऋषभ पंतचं नावही दिल्लीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत आहे.
विराट कोहलीने डीडीसीएला आपण विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. 37 वर्षांच्या विराट कोहलीने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये लागोपाठ 2 शतकं आणि एक अर्धशतक केलं होतं. सीरिजमध्ये 302 रन केल्यामुळे विराटला प्लेअर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं.

दिल्लीच्या मॅच कधी?

दिल्ली विजय हजारे ट्रॉफीमध्ये पहिली मॅच 24 डिसेंबरला अलूरमध्ये आंध्र प्रदेशविरुद्ध खेळेल. 15 वर्षांमध्ये पहिल्यांदाच विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विराट इंग्लंडहून भारतात येईल, असं सांगण्यात येत आहे.
advertisement

रोहित शर्माही खेळणार?

दुसरीकडे विराट कोहलीनंतर रोहित शर्माही मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. विजय हजारे ट्रॉफीनंतर विराट आणि रोहित जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये खेळताना दिसतील. यानंतर पुढचे बरेच महिने टीम इंडिया वनडे क्रिकेट खेळणार नाही. विराट आणि रोहितने टेस्ट आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तसंच भारतीय टीम फार वनडे क्रिकेटही खेळत नाहीये, त्यामुळे बीसीसीआय, टीम मॅनेजमेंट आणि निवड समिती विराट आणि रोहितने मॅच प्रॅक्टिस आणि फिटनेससाठी स्थानिक क्रिकेटमध्ये खेळावं, यासाठी आग्रही आहे. 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची तयारी सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : विराटने इंग्लंडमधून मेल केला, भविष्याचा प्लान सांगितला, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं!
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement