जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला अशोक चव्हाण यांच्याकडून जोरदार उत्तर, तुमच्या नेत्याने शंकररावांना.....
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मूळ राष्ट्रवादीचे आमदार, विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं.
नांदेड : मूळ राष्ट्रवादीचे आमदार, विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं. शंकरावजी हयात असताना आव्हाडांच्या नेत्यांनी कसा अपमान केला हे मला सांगायची गरज नाही, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी आव्हाड यांच्यावर पलटवार केला.
काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार अपमान केला. दोन वेळा त्यांना निवडणुकीत पराभूत केले, अशा आशयाचा फलक हाती घेऊन खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसविरोधात भाजप खासदारांच्या साथीने आंदोलन केले. या आंदोलनाचा फोटो समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला. हाच फोटो ट्विट करून आव्हाड यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. जाऊ द्या शंकररावजी, अशोकरावजींना माफ करा... तुम्हाला काय यातना होत असतील हे आम्ही समजू शकतो, असा खोचक टोला आव्हाड यांनी लगावला होता.
advertisement
शंकरराव चव्हाण हयात असताना आव्हाड यांच्या नेत्यांनी त्यांना त्रास दिला
शंकरराव चव्हाण हयात असताना राजकारणामध्ये त्यांना त्रास देण्याचे काम आव्हाड यांच्या नेत्यांनी (शरद पवार) केले. भाजपने जे आंदोलन केले ते बाबासाहेबांच्याविषयी आदर ठेऊन इतिहासात जे वास्तव आहे तेच पंतप्रधान मोदींनी, अमित शाहांनी मांडले. त्यामुळे कुठल्याही गोष्टींचा विपर्यास करून अश्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे अयोग्य आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.
advertisement
आव्हाड यांच्याकडून मला निष्ठा शिकायची गरज नाही
आव्हाड हे अगोदर कुठे होते, नंतर राष्ट्रवादीमध्ये आले, त्यामुळे निष्ठेबाबतीत त्यांची काय भूमिका होती हे मला नव्याने मला शिकवण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी अशोक चव्हाण यांनी आव्हाड यांना लगावला .
त्या फोटोवरून आपण फार ट्रोल होताय...
सुषमा अंधारे यांच्या टीकेवर विचारले असता, प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलेच पाहिजे असे काही गरजेचे नाही. माझ्यावर बोलून त्यांना काही मिळवायचे असेल तर त्यांनी जरूर मिळवावे पण त्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करायची गरज नाही, असे चव्हाण म्हणाले. तसेच फोटोवरून झालेल्या ट्रोलिंगबद्दल विचारले असता,राजकारणात अशा गोष्टी चालतात, असे ते म्हणाले.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
December 21, 2024 7:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला अशोक चव्हाण यांच्याकडून जोरदार उत्तर, तुमच्या नेत्याने शंकररावांना.....