काँग्रेसच्या काळातही विकास झाला पण भाजपच्या विकासाची गती दुपटीने अधिक: अशोक चव्हाण
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ashok Chavan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीच्या निमित्ताने नांदेड येथे पत्रकार परिषद झाली.
मुजीब शेख, नांदेड : काँगेसच्या काळात विकास झाला, मात्र त्यापेक्षा दुपटीने मागच्या अकरा वर्षात देशाचा विकास झाला. याचाच अर्थ भाजपच्या विकासाची गती अधिक आहे, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री, भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीच्या निमित्ताने नांदेड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी अशोक चव्हाण, पालकमंत्री अतुल सावे, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार श्रीजया चव्हाण, भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख, संतोष पांडागळे उपस्थित होते.
advertisement
काँग्रेस काळात झालेल्या विकासापेक्षा भाजपच्या विकासाचा वेग दुपटीने
अशोक चव्हाण म्हणाले, मी काँगेस मध्येच होतो. काँगेसच्या काळात विकास झाला नाही का? या प्रश्नाचा रोख माझ्याकडेच आहे. पण काँग्रेस काळात झालेल्या विकासापेक्षा भाजपच्या विकासाचा वेग दुपटीने आहे.
काँगेसच्या काळातही विकास झाला मात्र जो विकास मागच्या अकरा वर्षात झाला, तो अधोरेखित करण्यासारखा आहे. विकासाचा वेगही लक्षात घ्यावा लागतो. आज जमाना आयपीएलचा आहे. त्यामुळे कमी वेळेत लक्ष्य गाठणे महत्त्वाचे आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.
advertisement
वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत, त्याचे श्रेय रावसाहेब दानवे यांनाच: अशोक चव्हाण
वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत वाढण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला. या निर्णयानंतर नांदेडमध्ये श्रेयवाद सुरू आहे. मात्र वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत वाढण्याच्या निर्णयाचे श्रेय तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. दानवे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. जालना ते नांदेडपर्यंत रेल्वे लाईनचे काम सुरू होते. त्यामुळे तो निर्णय आता झाला. आता कोण श्रेय घेते मला माहिती नाही. रावसाहेब दानवे यांनी 2023 सालीच ही घोषणा केली होती. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असेही चव्हाण म्हणाले.
view commentsLocation :
Nanded,Maharashtra
First Published :
June 14, 2025 8:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेसच्या काळातही विकास झाला पण भाजपच्या विकासाची गती दुपटीने अधिक: अशोक चव्हाण


