Ashok Kharat Case : ओशनो जलसाठी मदत, गर्भपाताच्या गोळ्या...खरातच्या पापात डॉक्टर अडकले, एसआयटी चौकशीत काय झालं?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ashok Kharat Case : नाशिकचा स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.एसआयटीच्या (SIT) तपासात नाशिकमधील काही बड्या डॉक्टरांचे खरातसोबत संगनमत असल्याचे उघड झाले आहे.
नाशिक: नाशिकचा स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पहिल्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर, आज (२ एप्रिल) त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, एसआयटीच्या (SIT) तपासात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली आहे. यामध्ये नाशिकमधील काही बड्या डॉक्टरांचे संगनमत असल्याचे उघड झाले आहे. एसआयटीनं चौकशी केलेल्या एका डॉक्टरला राजकीय पाठबळ असल्याचे सांगण्यात येते. तर, आणखी एक डॉक्टर हा पंचवटीमधील बडा डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे.
भोंदू खरात हा महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत असे. तुझ्या शरीरातील दोष दूर करण्यासाठी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील," असा मानसिक दबाव तो महिलांवर टाकत असे. दोष मोठा असल्याचे सांगून तो अनेकदा महिलांचे शोषण करत असे. धक्कादायक म्हणजे, पीडित महिला गर्भवती राहू नयेत यासाठी त्यांना गुपचूप गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जात होत्या.
advertisement
नाशिकमधील बडे डॉक्टर अडकणार?
एसआयटीने मागील काही दिवसात नाशिकमधील काही डॉक्टरांची कसून चौकशी केली. या चौकशीत काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्याची माहिती आहे. महिलांच्या लैंगिक शोषणात खरातला मदत करणाऱ्या दोन डॉक्टरांची नावे तपासाच्या कक्षेत आली आहेत. यातील एक डॉक्टर राजकीय पार्श्वभूमी असलेला, तर दुसरा पंचवटी परिसरातील नामांकित व्यावसायिक असल्याची चर्चा आहे. या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खरात महिलांना गुंगीची औषधे आणि गर्भपाताच्या गोळ्या पुरवत असल्याचा संशय आहे. लवकरच या पांढरपेशी गुन्हेगारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
advertisement
अशोक खरातने नाशिकमधील काही डॉक्टरांशी संगनमत करून 'ओशनो जल' या नावाखाली महिलांना गुंगीची औषधे आणि वेदनाशामक गोळ्या दिल्याचे तपासात उघड झाले आहे. इतकेच नव्हे, तर अत्याचारामुळे गर्भवती राहिलेल्या एका पीडितेचा गर्भपात करण्यासाठी खरातने चक्क आपल्या 'ओकस' कार्यालयातच तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेचे लैंगिक शोषण आणि गर्भपात केल्याच्या गुन्ह्यात आज कोर्टात सुनावणी होणार आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 11:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case : ओशनो जलसाठी मदत, गर्भपाताच्या गोळ्या...खरातच्या पापात डॉक्टर अडकले, एसआयटी चौकशीत काय झालं?







