अशोक खरात किती फोन वापरायचा? कुणासाठी कुठला फोन? पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
भविष्यातील घटनांची भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात हा आपल्याकडे येणाऱ्या भाविकांना जादूटोणा करायला लावत असल्याची माहिती समोर आली.
नाशिक : भोंदूगिरी, महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, करोडेंचे गैरव्यवहार अशी काळ्या कारनाम्यांची लंका खरातने उभारली होती. एसआयटी अर्थात विशेष पोलीस पथकाने अशोक खरात याच्याभोवतीचा फास आवळला आहे. एसआयटीच्या तपासात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरला आहे. राजकीय नेते, दिग्गज मंत्री, अनेक सनदी अधिकारी, नावाजलेले पोलीस अधिकारी, डॉक्टर, निष्णात वकील, व्यावसायिक आदी मंडळींना अशोक खरात याने आपली भुरळ पाडली होती. नवनवीन पूजा सांगून दोष निवारण करण्याचा दावा अशोक खरीत संबंधितांकडे करीत असे. यासाठी तो अनेकांशी फोनवरून संपर्कात असे. विशेष वेळी विशेष लोकांना वेळ देऊन आपल्याकडे येण्यास तो भाग पाडत असे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे समोरचा माणूस कोण आहे, यावरून कोणत्या मोबाईलवरून फोन लावायचा, हे खरातचे ठरलेले असायचे.
advertisement
अशोक खरात याच्याकडे चार फोन होते
सूत्रांच्या माहितीनुसार, खरात एक नाही दोन नाही तर चार-चार मोबाईल फोन वापरत होता. एक नंबर आर्थिक व्यवहारांसाठी तर दुसरा मोबाईल महिलांसाठी असे चार मोबाईल वेगवेगळ्या कामांसाठी तो वापरत होता अशी माहिती समोर आली.
कुणासाठी कुठला फोन?
पहिला नंबर
-व्हीआयपी लोकांसाठी
दुसरा नंबर
-खास अनुयायी, महिलांसाठी
तिसरा नंबर
-आर्थिक व्यवहारांसाठी
advertisement
चौथा नंबर
-रोजच्या वापरासाठी
अशोक खरात याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
अशोक खरात याला न्यायालयाने तीन वेळा पोलीस कोठडी दिली होती. आज चौथ्यांदा त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर विशेष पोलीस पथकाने दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात न्यायालयाकडे अर्ज केला. पोलिसांनी खरातल्या ताबा घेतल्यानंतर त्याच्यावर पुन्हा प्रश्नांची सरबत्ती होण्याची शक्यता आहे.
advertisement
अशोक खरात दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात
अशोक खरात याला उद्या ताब्यात घेणार अशी चर्चा सुरू असताना अशोक खरात याला आजच विशेष पोलीस पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. दुपारी पावणे तीनच्या सुमारास खरात याला कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 9:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशोक खरात किती फोन वापरायचा? कुणासाठी कुठला फोन? पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर










