50 क्विंटल चपात्या, 40 क्विंटल भाजी; गावाने जपली 100 वर्षांपासूनची परंपरा

Last Updated:

जगभरात जाती, धर्म, पंथावरून वादंग व युद्ध होत असल्याचे आपण पाहतो. पण, नाचनवेल गावात हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या व्यक्ती एकोप्याने राहतात

+
50

50 क्विंटल चपात्या, 40 क्विंटल भाजी; गावाने जपली 100 वर्षांपासूनची परंपरा

छत्रपती संभाजीनगर: श्रावण महिन्यात सर्व धार्मिक ठिकाणी भक्तांची मांदियाळी असते. कन्नड तालुक्यातील नाचनवेल (कोपरवेल) हे गाव देखील याला अपवाद नाही. याठिकाणी श्री भिकनशावली महाराजांचा मोठा भंडारा (महाप्रसाद) असतो. या उपक्रमाला 100 वर्षांची परंपरा असून ग्रामस्थांनी आजतागायत ती जपली आहे. महाप्रसादासाठी 50 क्विंटल गव्हाच्या चपात्या आणि 40 क्विंटल डांगराची (भोपळा) भाजी असते. विशेष म्हणजे या उपक्रमात गावातील सर्वधर्म समभाव दिसून येतो.
कन्नड तालुक्यातील अवघी चार हजार लोकवस्ती असलेल्या 'नाचनवेल' या गावाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जगभरात जाती, धर्म, पंथावरून वादंग व युद्ध होत असल्याचे आपण पाहतो. पण, नाचनवेल गावात हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या व्यक्ती एकोप्याने राहतात, अशी माहिती ग्रामस्थ विठ्ठल थोरात यांनी लोकल 18 शी सोबत बोलताना दिली.
advertisement
अंजना नदीच्या तीरावर वसलेल्या या गावातील ग्रामस्थांसाठी हा कार्यक्रम दिवाळी सणापेक्षाही मोठा असतो. या कार्यक्रमासाठी सासरी असलेल्या लेकीबाळी आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले लोक आवर्जून गावात हजेरी लावतात.
सर्व सुविधांनी युक्त गाव
गावात हनुमान मंदिर आणि मशीद एकमेकांच्या शेजारी आहे. ग्रामस्थांची एकजूट, धर्मनिरपेक्षता, गावातील स्वच्छता आणि विकासकामांमुळे हे गाव कौतुकाचा विषय बनले आहे. नाचनवेल, कोपरवेल या दोन्ही गावांत जिल्हा परिषदेच्या दहावीपर्यंत शाळा आहे. गावात अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाचनालय इत्यादी सर्व सोयी-सुविधा आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
50 क्विंटल चपात्या, 40 क्विंटल भाजी; गावाने जपली 100 वर्षांपासूनची परंपरा
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement