खंडणीच्या पैशातून नदीकाठी ७२ एकरात बच्चू कडूंचा 'हवामहाल', भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ

Last Updated:

पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे ७२ एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या असल्याचा आरोप भाजप आमदारने केला आहे.

News18
News18
मुंबई: भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडूंवर गंभीर आरोप केले बच्चू कडू तब्बल तीन वेळा अचलपूर मतदार संघाचे आमदार राहिलेत या काळात त्यांनी चांदूरबाजार-परतवाडा रोडवर नदीकाठी 72 एकर परिसरात फार्म हाऊस बांधल्याची तक्रार प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बच्चू कडूंनी केवळ समाजसेवेचा बुरखा पांघरलाय, मात्र त्यांनी शेतकऱ्यांकडून अल्प दरात जमीन लाटल्याचा आरोप आमदार तायडे यांनी केला आहे. दरम्यान बच्चू कडूंच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी तायडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
बच्चू कडू राज्यमंत्री असताना पदाचा गैरवापर करून त्यांनी या परिसरात शासनाचा निधी वापरल्याचा आरोप केला आहे. गोरगरिबांच्या जमिनी वाटप अल्प दरात लाटून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे ७२ एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या असल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी केला आहे.
advertisement

काय आहे आमदार प्रवीण तायडे यांचे आरोप?

  • 72 एकर परिसरात खंडणीच्या पैशातून उभारलेल्या माजी आमदार बच्चू कडू यांच्या 'हवामहालाची' उच्चस्तरीय चौकशी करा
  • गोरगरिबांच्या जमिनी वाटप अल्पदरात लाटून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे ७२ एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या असल्याचा आरोप
  • कोट्यावधींचा अवैध पैसा या परिसराच्या विकास कामांवर वापरण्यात आला आरोप
  • बच्चू कडू राज्यमंत्री असताना पदाचा गैरवापर करून त्यांनी या परिसरात शासनाचा निधी वापरल्याचा आरोप
  • गुटखा माफिया, लँड माफिया, वाळू माफिया, अवैध व्यवसायमध्ये भागीदारी असलेल्या लोकांकडून खंडणी गोळा करून हा परिसर विकसित करण्यात आल्याचे प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले
  • हा हवामहाल ताब्यात घेऊन सरकारने सील करावा..
  • बच्चू कडू आणि त्यांच्याशी संबंधित असलेले लोक, संस्था आणि त्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीची देखील चौकशी करण्याची मागणी आमदार प्रवीण तायडे यांनी केली आहे
advertisement

शेतकऱ्यांनी मर्जीने बच्चू कडू यांना जमिनी विकल्या

परतवाडा चांदूरबाजार मार्गावर पूर्णा नदी काठावर बच्चू कडूंची मूकबधिर निवासी शाळा त्याच ठिकाणी प्रहारचे कार्यालय आणि निवासस्थान आहे. जमीन पडीक होती त्यात कुठलेही पीक येत नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांनी मर्जीने बच्चू कडू यांना जमिनी विकल्या. अंध अपंग आणि मूकबधिर यांना शिक्षण घेता यावे म्हणून या ठिकाणी शाळा उभारली, या परिसरात कुठेही स्विमिंग टँक नसल्याची माहिती बच्चू कडू यांचे समर्थक विनोद कोरडे यांनी दिली.
advertisement

बच्चू कडू दोषी असेल तर कारवाई करावी : विनोद कोरडे  

तसेच भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांचे हे आरोप बिनबुढाचे असून त्यांचं सरकार आहे त्यांनी चौकशी करावी आणि बच्चू कडू दोषी असेल तर कारवाई करावी, असे देखील विनोद कोरडे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खंडणीच्या पैशातून नदीकाठी ७२ एकरात बच्चू कडूंचा 'हवामहाल', भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement