Beed News : बीडमध्येही दिसणार 'बदलापूर पॅटर्न', धनंजय मुंडेंचे वक्तव्य, शिंदे गटाची धाकधूक वाढली

Last Updated:

Beed News : बीडमधील निवडणुकीत मुंडे बंधू-भगिनी एकत्र येण्याची दाट शक्यता असून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी तसे संकेत दिले आहेत.

बीडमध्येही दिसणार 'बदलापूर पॅटर्न', धनंजय मुंडेंचे वक्तव्य, शिंदे गटाची धाकधूक वाढली
बीडमध्येही दिसणार 'बदलापूर पॅटर्न', धनंजय मुंडेंचे वक्तव्य, शिंदे गटाची धाकधूक वाढली
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. विविध जिल्ह्यात राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे आघाडी युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे स्वबळाची चाचपणी करण्यात येत आहे. आता बीड जिल्ह्यातही 'बदलापूर पॅटर्न'ची चर्चा सुरू झाली आहे. बीडमधील निवडणुकीत मुंडे बंधू-भगिनी एकत्र येण्याची दाट शक्यता असून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी तसे संकेत दिले आहेत.
बीडच्या परळी तालुक्यातील बोधेगाव येथे विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी संभाव्य युतीचे संकेत दिले. ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद… आम्ही कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नाही. माझी आणि ताई (पंकजा मुंडे) यांची राज्यात महायुतीची सत्ता आहे. या संदर्भात चर्चा झाली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीतही भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढेल, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
advertisement
धनंजय मुंडे यांनी म्हटले की, माझी आणि पंकजाताईंची चर्चा झाली आहे. आणखी पूर्ण चर्चा होणे बाकी आहे. त्यामुळे इच्छुक आहेत त्यांनी निश्चिंत राहावे असेही मुंडे यांनी म्हटले. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास शिंदे गटाला स्वबळ अथवा मुंडे बहीण-भावांच्या निर्णयासमोर नमतं घ्यावं लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचेही या संभाव्य युतीकडे लक्ष लागले आहे.
advertisement
मुंडे बहिण-भाऊ हे लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूकीत एकत्र दिसले होते. आता नगरपालिका व जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूकीतही एकत्र आल्यास विरोधकांना कडवी झुंज द्यावी लगणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News : बीडमध्येही दिसणार 'बदलापूर पॅटर्न', धनंजय मुंडेंचे वक्तव्य, शिंदे गटाची धाकधूक वाढली
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement