बाप तो बाप रहेंगा! बीडच्या नगरसेविकेच्या पतीचा उन्माद, धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाने मिरवणुकीत उधळल्या नोटा; Video समोर
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नगरपालिका निवडणुकीत खैसर राजा खान यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांच्या प्रभागात जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली.
बीड : बीड जिल्ह्यातील परळी नगरपालिका निवडणुकीनंतर एक वादग्रस्त प्रकार समोर आला असून, विजयी मिरवणुकीत नोटा उधळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रभाग क्रमांक 9 ब मधून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खैसर राजा खान या विजयी झाल्यानंतर त्यांच्या पतीकडून काढण्यात आलेल्या विजयी रॅलीत हा प्रकार घडला आहे
नगरपालिका निवडणुकीत खैसर राजा खान यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांच्या प्रभागात जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. याच दरम्यान “बाप तो बाप रहेगा” हे गाणे लावून राजा खान यांनी रॅलीदरम्यान नोटा उधळल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
राजा खान धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय
advertisement
राजा खान हे परळी नगरपालिकेचे माजी नगरसेवक असून, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या घटनेला केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर राजकीय वर्तुळातही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक काळात तसेच निकालानंतरही आचारसंहिता आणि सार्वजनिक शिस्त पाळणे अपेक्षित असते. मात्र विजयानंतर अशा प्रकारे उघडपणे नोटा उधळल्याने नियमांचे उल्लंघन झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
advertisement
निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे
या व्हायरल व्हिडिओमुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या आर्थिक प्रदर्शनावर किंवा लोकांना प्रभावित करणाऱ्या कृतींवर आयोगाकडून कठोर कारवाई केली जाते. त्यामुळे या प्रकरणात निवडणूक आयोग स्वतःहून दखल घेऊन चौकशी करणार का, तसेच संबंधितांवर कोणती कारवाई होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परळी शहरात चर्चेला उधाण आले असून, लोकशाही प्रक्रियेतील शिस्त आणि जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 8:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बाप तो बाप रहेंगा! बीडच्या नगरसेविकेच्या पतीचा उन्माद, धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाने मिरवणुकीत उधळल्या नोटा; Video समोर










