Beed Santosh Deshmukh Case : ''हे असले अधिकारी वाल्मिकच्या शिक्षेसाठी मदत करतील?'' आव्हाडांनी बॉम्ब फोडला
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Beed Santosh Deshmukh Case : या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर शंका उपस्थित केली जात आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधीमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे.
मुंबई : मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक आरोप होत असून चौकशीतही धक्कादायक खुलासे होत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीकडे तपासाची सूत्रे आहेत. तर, दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर शंका उपस्थित केली जात आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधीमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीआयडी आणि एसआयटीने हाती घेतली. त्यानंतर तपासाला वेग आला आणि आरोपी जेरबंद होण्यास सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये उठबस असणारा वाल्मिक कराड हा या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत आहे. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप होत आहे. आता, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे.
advertisement
जितेंद्र आव्हाडांनी कोणता गंभीर आरोप केला?
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख प्रकरणातील एसआयटी पथकातील अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केला आहे. आव्हाड यांनी म्हटले की, तोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? असा सवालही आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याच विघ्ने याने निवडणूक काळात धनंजय मुंडेचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केले असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला.
advertisement
&
संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील… pic.twitter.com/5BThMPUvng
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2025
advertisement
;
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, मनोजकुमार वाघ हा वाल्मिक कराडचा आत्यंत खास माणूस असून गेले 10 वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय असेही आव्हाड यांनी म्हटले.
इतर संबंधित बातमी :
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 05, 2025 10:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed Santosh Deshmukh Case : ''हे असले अधिकारी वाल्मिकच्या शिक्षेसाठी मदत करतील?'' आव्हाडांनी बॉम्ब फोडला